दरम्यान, गुरुवारी सकाळपासूनच अंत्यसंस्कारास सुरुवात केली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत २६ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, आणखी चार मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे शिल्लक आहे. हे अंत्यसंस्कार करतांना दिवसभर केवळ चहा आणि कचोरी खाऊन केले. कोणीही जेवणासाठी घरी गेले नाही. घरी जाण्यासाठी वेळ नसल्यानेच आम्ही सर्वांनी मिळून भाेजन न करता अंत्यसंस्काराला प्राधान्य दिल्याचेही वानखेडे म्हणाले.
मनुष्यबळ वाढविले
कोरोनामुळे मृत्यू पडणाऱ्यांची संख्या ही दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर आणि नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी तातडीने लक्ष घालून दहा माणसे वाढवून दिल्याने आता आम्ही सर्व मिळून २५ जण झालो आहोत. यातच आमदार कैलास गोरंट्याल यांनी देखील जातीने फोन करून अंत्यसंस्कार करीत असतांना तुमची काळजी घ्या असेही सूचविले.