लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने सोयाबीनसह कपाशीच्या उत्पनावरही परिणाम होणार आहे. सोयाबीनचे उत्पन्न तर यंदा ४० टक्यांनी कमी होणार असल्याचे जालना बाजारपेठेतील आजच्या आवकेवरून दिसून येते. खरीप हंगामा नंतर पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी आता आपला मोर्चा रबीच्या तयारीकडे वळविला आहे. रबी हंगामासाठी जालना जिल्ह्यातील शेतक-यांना २०३ कोटी रूपयांचे पीककर्ज देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सहकार निबंधक एन.व्ही. आघाव यांनी दिली.जालना जिल्ह्याला चालू खरीप आणि रबी हंगामासाठी कृषी पत आराखड्यात एकूण एक हजार ४६८ कोटी रूपयांचे उद्दिष्ट दिले होते. पैकी खरीप हंगामात एक लाख २२ हजार शेतक-यांना जवळपास ८०३ कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आल्याचेही आघाव यांनी सांगितले. यंदा पीककर्जाची गती वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तालुका निहाय तहसील, बँक आणि सहकार अशा तीनही विभागांचे एकत्रित मेळावे आयोजित केल्याने मोठा चांगला फरक पडला. पीककर्ज माफीनंतर नव्याने पीककर्ज देण्यासाठीची लगबग सुरू झाली होती. मात्र काही एक दोन बँका वगळता अन्य बँकांनी पीककर्ज वाटपासाठी पश्चिम महाराष्ट्रातून कर्मचारी मागवून शेतक-यांना मदत केली.तयारी : रबी हंगामासाठी सरसावले शेतकरीशेतकºयांनी आता सोयाबीनवर नांगर फिरवून रबी हंगामासाठी शेतीची मशागत करण्याचे नियोजन केले असून, ज्वारी, गहू अणि हरभरा ही पिके लावण्यावर यंदा भर राहणार असल्याचे दिसून येते.कोरडवाहू शेतक-यांसाठी आता पूर्णपणे भिस्त ही परतीच्या पावसावर राहणार आहे.नवरात्रात ज्वारीची पेरणी झाल्यावर दोन ते तीन मोठे पाऊस पडल्यास ज्वारीची चिंता दूर होऊ शकते. मात्र ज्यांच्याकडे पाणी देण्याची व्यवस्था आहे, ते शेतकरी गहू आणि हरभरा लावण्यावर भर देत असल्याचे सांगण्यात आले.
जालना जिल्ह्यात २०९ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 12:26 AM