जालना : जिल्ह्यातील तीन व्यक्तींचा अहवाल बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या एकाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ०.२५ वर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या समाधानकारकरित्या घटली आहे. जिल्हा आरोग्य विभागाला बुधवारी १२२३ जणांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यात तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.२५ टक्के आहे. यात आरटीपीसीआरच्या १२१९ जणांच्या तपासणीत तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.२ टक्के आहे. तर चौघांच्या ॲँटिजन तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. बाधितांमध्ये परतूर तालुक्यातील परतवाडी येथील एक व अंबड शहरातील दोन रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६१ हजार ७७६ वर गेली असून, त्यातील ११९० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजवर ६० हजार ५४५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या ४१ सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चौकट
९३८ नमुने प्रलंबित
जिल्हा आरोग्य विभागाकडून तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी ९३८ जणांचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या समाधानकारकरित्या घटली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी वेळेत लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. शिवाय लसीकरणानंतरही मास्क वापरासह इतर प्रशासकीय सूचनांचे पालन सर्वांनी करणे गरजेचे आहे.