जालना : एका समाजाबाबत आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करणाऱ्याविरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. विशाल आगळे (रा. शंकर नगर जालना) असे आरोपीचे नाव आहे.
सोशल मीडियाचा वापर करुन विशालने एका समाजाबाबत आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केला. या १५ सेंकदाच्या व्हिडिओमुळे त्याने एका समाजाच्या भावना दुखावल्या. यावरून शुक्रवारी रात्री शंभर ते दीडशे जणांचा जमाव कदीम पोलीस ठाण्यासमोर जमा झाला होता. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परीक्षाधीन पोलीस अधीक्षक यशवंत जाधव, पोनि. यशवंत जाधव, पोनि. संजय लोहकरे यांनी जमावाला शांत केले. विशाल आगळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.