लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश खपलेंना एका महिलेने केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शनिवारी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन करून या घटनेचा निषेध केला.जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश खपले यांना शुक्रवारी एका महिलेने जमिनीच्या निकालाचे प्रकरण पुढे करीत त्यांना मारहाण केली होती. सदरील महिलने या प्रकरणी सक्षम न्यायालयात दाद मागणे उचित असतांना कायदा हातात घेत जिल्हाच्या उच्चपदस्थ अधिका-यास मारहाण करणे अयोग्य आहे. अधिका-यांवरील असे हल्ले कदापी खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रकारे अधिकारी, कर्मचा-यांचे हल्ले केल्यास त्याचा कामावर परिणाम होण्याची चिंता यावेळी कर्मचा-यानी व्यक्त केली. हा चिंतेचे विषय आहे. अशा घटना भविष्यात घडू नये व सदरील महीलेस कडक शिक्षा करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी महसूल विभागातर्फे उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयातील कर्मचा-यांनी ठिय्या आंदोलन करून दिवसभर काम बंद आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचा-याचंी उपस्थिती होती.
परतूरमध्ये महसूलचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:24 AM