वडीगोद्री : अंबड तालुक्यातील मठतांडा येथे गुरूवारी रात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. एका घरातील दोन मोबाईल लंपास केले. तर मंगळसूत्र चोरीस प्रतिबंध करणाऱ्यावर धारदार शस्त्राने वार करीत लोखंडी रॉडने मारून करून गंभीर जखमी केले. संजय मुरलीधर राठोड असे जखमीचे नाव असून, या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मठतांडा येथील गुलाब लक्ष्मण जाधव यांच्या घरातील दोन मोबाईल गुरूवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी लंपास केले. तेथून ५०० मीटर अंतरावर संजय मुरलीधर राठोड यांचे घर आहे. संजय राठोड व त्यांच्या पत्नी शांताबाई हे दोघे घरासमोर झोपले होते. दरोडेखोरांनी शांताबाई यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झोपेतून उठलेल्या संजय राठोड यांनी दरोडेखोरास प्रतिकार केला. त्यांनी एका दरोडेखोराला पकडले. मात्र, इतर दरोडेखोरांनी धारदार चाकूने त्यांच्यावर पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला. हे वार राठोड यांनी हातावर धरल्याने सुदैवाने ते बचावले. दरोडेखोरांनी त्यांच्या पायावर वार करून लोखंडी रॉडने दोन्ही पायावर मारहाण करण्यास सुरूवात केली.गोंधळ ऐकून जागे झालेल्या राठोड यांच्या मुलांनी आरडाओरड केली. त्यामुळे दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. जखमीवर जालना येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सी.डी शेवगन, गोंदी पोलिस ठाण्याचे सपोनि शिवानंद देवकर, पोउपनि हनुमंत वारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.कोंबड्याही पळविल्यादरोडेखोरांचा माग काढणारे श्वान पथक गुलाब जाधव यांच्या घराजवळून थोड्या अंतरावर असलेल्या ठिकाणी गेले होते. तेथे ताट, दारूच्या बाटल्या, ग्लास आढळून आले. तसेच शेजारील एका शेतकºयाच्या चार कोंबड्या सुद्धा चोरून नेल्याचे समोर आले.
दरोडेखोरांच्या हल्ल्यात एकजण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:14 AM
अंबड तालुक्यातील मठतांडा येथे गुरूवारी रात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. एका घरातील दोन मोबाईल लंपास केले.
ठळक मुद्देमठतांडा येथील घटना : दोन मोबाईल केले लंपास; परिसरात पसरली मोठी दहशत