लोकमत न्यूज नेटवर्कजालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील ३ लाख ९७ हजार शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज केले होते. पैकी सुमारे दीड लाख शेतक-यांना कर्जमाफी मिळाली आहे. कर्जमाफीसाठी जिल्ह्याला ग्रीन यादीनुसार ९५८ कोटी रुपये प्राप्त झाले असले तरी शेतक-यांच्या खात्यावर प्रत्यक्षात ५९३ कोटी रुपये जमा झाले आहेत. उर्वरित दीड लाखावर शेतकरी अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी बँकेत चकरा मारत आहेत.जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्जदार असलेल्या ३ लाख ९७ हजार शेतक-यांनी कर्जमाफी मिळावी यासाठी आपले सरकार वेब पोर्टलवर आॅनलाईन नोंदणी केली होती. राष्ट्रीयीकृत बँकांनी थकित कर्जदार असलेल्या तीन लाख १२ हजार शेतक-यांची माहिती आॅनलाईन अपडेट केली होती.
दीड लाखावर शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:44 AM