लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : स्वप्नील भुते खून प्रकरणातील मुख्य आरोपी कुमार सोनोने यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली तर त्याच्या दुस-या साथीदाराची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे.१४ जून रोजी मासरूळ जिल्हा बुलडाणा येथील स्वप्नील श्रीरंग भुते याचा प्रेम प्रकरणात अडथळा येतो म्हणून कुमार सोनोने याने त्याच्या एका अल्पवयीन मित्राला सोबत घेऊन स्वप्नील भुते याचा पारध परिसरात खून केला होता. त्यानंतर हे आरोपी फरार झाले. मात्र, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, सपोउपनि. शंकर शिंदे व कर्मचाऱ्यांनी चार दिवसांमध्ये त्यांना ताब्यात घेतले होते.कुमार सोनोने याला भोकरदन न्यायालयाने २४ जून पर्यंत पोलीस कोठडी दिली होती तर अल्पवयीन असलेल्या दुस-या एकाला २० जून रोजी बालसुधार गृहात पाठविण्यात आले आहे. कुमारला २४ जून रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.माझ्या मुलाचा ज्या कारणावरून खून करण्यात आला आहे, त्याला सदर मुलगी सुध्दा जबाबदार आहे. यामुळे तिची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी स्वप्नीलचे वडील श्रीरंग भुते यांनी पोलिसांकडे केली.
एकाची बाल सुधारगृहात रवानगी तर दुसऱ्याला न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:30 AM