जिल्ह्यात तूर हमीभाव खरेदीला सुरुवात
जालना : हंगाम २०२०-२१ साठी आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हमीभावाने नाफेडच्या वतीने तूर खरेदीस बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. जालना, अंबड, तीर्थपुरी, मंठा, भोकरदन, परतूर, जाफराबाद, सातोना, तळणी येथील नऊ केंद्रांवर ही खरेदी करण्यात येत आहे. ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रांची पाहणी करूनच ही खरेदी केली जात असल्याचे सांगण्यात आले.
दानकुंवर महाविद्यालयात पराक्रम दिवस साजरा
जालना : शहरातील श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालयात शनिवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ.विजय नागोरी, डॉ.जितेंद्र अहिरराव, डॉ.झेड. बी. काजी, डॉ.बी. जी. श्रीरामे आदींची उपस्थिती होती.
विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण
जालना : येथील जीवनराव पारे विद्यालयात आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वाटप करण्यात आले. नववी वर्गातून पूजा आदमाने प्रथम, रूपाली गायकवाड द्वितीय, जयेश मुंढे तृतीय तर दहावी वर्गातून दिव्या यादव प्रथम, शितल लासुरे द्वितीय व पवन कोकणे याने तृतीय क्रमांक पटकावला.