सगेसोयरे अध्यादेशाची आम्ही दिलेल्या व्याख्येसह अंमलबजावणी करावी, सर्व गुन्हे मागे घ्यावेत, यासह नऊ मागण्यांबाबत मंत्र्यांच्या स्वाक्षरीनुसार लेखी द्या, अन्यथा उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे- पाटील यांनी मांडली.
मुंबई : औषधोपचार घ्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांना दिले. जालनाचे सिव्हिल सर्जन डॉ. चावरे हे जरांगे-पाटील यांची तपासणी करतील आणि उपचाराबाबत निर्णय घेतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
जरांगे-पाटील हे उपोषण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहेत. लोकांना चिथावणी देत आहेत, असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अजय गडकरी व न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे होती.
न्यायालयाच्या आदेशानुसार जरांगे यांना विनंती केली. त्यांनी उपचारास होकार दिला, आम्ही सलाइन लावून त्यांना इंजेक्शन दिले आहेत. त्यांच्या सर्वच ब्लड चाचण्या करण्यासाठी त्याचे सॅम्पल देण्यात आले आहे. त्यानंतर त्यानुसार उपचार करण्यात येईल. - डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक