लोकमत न्यूज नेटवर्कजालना : संस्थेने नियमबाह्य कारवाई करून एका शिक्षकाचे थकविलेले थकीत वेतन व भत्ते त्वरित अदा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच दिल्याने जिल्ह्यातील संस्थाचालकांत एकच खळबळ उडाली आहे.छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था भोकरदन या संस्थेअंतर्गत श्री शिवाजी विद्यालय भारज (तालुका जाफराबाद) येथे शिक्षक केशव कोल्हे हे या शाळेवर २००५ पासून सह शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय विना वेतन कार्य करीत होते. या दरम्यान संस्थेने त्यांना २००९ मध्ये तोंडी आदेशान्वये बडतर्फ केले होते. तेव्हा कोल्हे यांनी शाळा न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती. यावर शाळा न्यायाधिकरणाने दिलेल्या स्थगिती नुसार तडजोड पत्र दाखल केले गेले होते. त्यात अपिलार्थी यांना संस्थेत रिक्त होणाऱ्या २०१० च्या अनुदानित पदावर प्राधान्याने घेण्यात येईल असे नमूद केले होते. संस्थेत त्यानंतर ३ अनुदानित पद भरून अनुदानित मान्यता इतर शिक्षकांच्या घेतल्याने संस्थने तडजोडीचे अनुपालन केले नाही. तसेच काही सेवा कनिष्ठ शिक्षकांना अनुदानावर घेतले होते. त्यामुळे कोल्हे हे आजपर्यंत विनाअनुदानित जागेवर २० टक्के वेतनावरच कार्यरत आहे.स्वागतार्ह निकालन्यायालयाने पीडित शिक्षकाच्या बाजूने दिलेला निकाल स्वागतार्ह आहे. यामुळे कोणत्याही संस्थाचालकांची शिक्षकांवर विनाकारण अन्याय करण्याची हिंमत होणार नाही. अन्यायग्रस्त शिक्षकांनी शांत न बसता आपल्यावर होणारया अन्यायाला न्यायालयामार्फत वाचा फोडावी. या निकालाने अनेक पीडित शिक्षकांना दिलासा मिळाला असल्याचे डी. एड. पदवीधर शिक्षक समन्यक समितीचे जिल्हा सचिव जगन वाघमोडे यांनी सांगितले.
थकीत वेतन व भत्ते अदा करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 1:02 AM