लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात प्रथमच १८ ते २२ मे दरम्यान कलश सिड्स मैदानावर जालना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशन, मारवाडी युवामंच, जालना फेस्टिव्हल समिती, जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १० एकरच्या जागेवर स्टेज, ड्रोन स्ट्रक्रचर, लॅण्ड स्केपिंग, मेटल लाईट, आंबा उत्सवसह आनंद नगरी, वॉटर पार्क असे मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडणार आहेत.महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी उद्योजक घनशाम गोयल, स्वागताध्यक्ष पालकमंत्री बबनराव लोणीकर, मुख्य संयोजक खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांची निवड करण्यात आली आहे. तर उपमुख्य संयोजकपदी जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांची निवड करण्यात आली आहे. महोत्सव समितीच्या स्वागत महामंत्रीपदी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे व उपमंत्रीपदी विरेंद्र धोका, कार्याध्यक्षपदी सुनील रायठ्ठठा, गौतम मुणोत, कैलास लोया, भावेश पटेल, अशोक पांगारकर यांची निवड करण्यात आली आहे.या महोत्सवासाठी सुभाष देविदान, उमेश पंचारिया, मनिषा तवरावाला, गोविंद्रप्रसाद मुंदडा, बाबुराव भुजंग, राजेश राऊत, प्रा. रावसाहेब ढवळे, रावसाहेब राऊत, अर्जुन गेही, सतीष अग्रवाल, ईस्माइल परसुवाले आदी प्रयत्न करत आहेत.
जालना महोत्सवाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 12:50 AM