लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अमेरिकेने पॅलेस्टाईनची राजधानी जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून घोषणा केली आहे. याविरोधात कदिम जालना इदगाहमध्ये जमिअत-ए-उलेमा हिंदच्या वतीने शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. जेरूसलेम आणि पॅलेस्टाईनशी आमचे अध्यात्मिक नाते असल्याचे महाराष्ट्र प्रदेश जमिअत ए उलेमा हिंदचे अध्यक्ष अफीज नदीम सिद्दीकी यांनी सांगितले.यावेळी अध्यक्षस्थानी मौलाना हसन मिल्ली, कार्याध्यक्ष एकबाल पाशा, अब्दुल हाफीज, जालना जिल्हाचे काजी-ए-शरिया मुफ्ती अब्दुल रहेमान, जिल्हा सचिव तय्यब देशमुख, शहर कार्याध्यक्ष मुफ्ती फईमसाब, मुफ्ती सोहेल, हाफेज जुबेर फारूकी, मौलाना रईस मिल्ली, मुफ्ती एहसान, हाफीज मुमताज, ब्रदर चाऊस, शेख माजेद, अकबर खान, रशीद पहेलवान, लियाकत अली खान यासेर, शेख सलीम, मौलाना सोहेल नदवी, इसा खान काशमी, हाफीज शब्बीर आदींची उपस्थिती होती.यावेळी हाफीज नदीम सिद्दीकी म्हणाले, आक्सा मशिद आणि आमचे अध्यात्मिक नाते आहे. मक्का, मदीना आणि मशिद-ए-आक्सा तसेच आम्हाला भारत वंदनीय आहे. आमचे हे आंदोलन राजकीय नसून प्रार्थना आहे. जोपर्यंत जेरूसलेम पॅलेस्टाईनला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले.यावेळी उपस्थित मान्यवरांची समायोचित भाषणे झाली. या आंदोलनात नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुफ्ती फईम यांनी केले. तर आभार तय्यब देशमुख यांनी मानले.
जेरुसलेम आणि पॅलेस्टाईनशी आमचे आध्यात्मिक नाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 1:13 AM