लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन/पारध : मोबाईल बंद झाला अन् आमच्या सुखी संसाराचे स्वप्न भंग तर झालेच; परंतु मी माझ्या प्रेयसीलही मुकलो. आम्ही मिळालेले आयुष्य एकत्रित जगण्याच्या आणाभाकाही घेतल्या होत्या. परंतु, हे नियतीला मान्य नव्हते. ज्या दिवशी भेट ठरली होती. त्या दिवशी तुम्ही येऊ नका, असा मेसेज मी मित्राच्या मोबाईलवरून छायाच्या मोबाईलवर पाठविला होता. मात्र, तिच्याकडे मोबाईल नव्हता आणि तिच्या वडिलांना तो मेसेज वाचता न आल्यानेच हा घात झाल्याची माहिती शुभमने चौकशी करणाऱ्या पोलिसांना जबाबा दरम्यान दिली.छाया डुकरे खून प्रकरणात पोलिसांना हवा असलेला तिचा प्रियकर शुभम वºहाडे याला पारध पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पारध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप उबाळे, पी. बी. माळी, शिवाजी जाधव हे माहिती जाणून घेत आहेत. शुभमला पोलिसांनी ओझरखेडा (ता. भुसावळ) येथून १ डिसेंबरला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने सांगितले की, वर्षभरापूर्वी पुणे येथे अपंग प्रशिक्षण केंद्रात छाया डुकरे आणि माझी ओळख झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले . त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले, असे शुभम याने सांगितले. शिवाय आम्ही दोघांनी विवाह करण्याचा निर्णयही घेतला होता, त्यासाठी १८ जूनला ४ वाजता जळगाव येथील विशेष विवाह अधिकारी कार्यालयात नोंदणी देखील केल्याचे तो म्हणाला. त्यावरून संबंधित कार्यालयाने त्यांना विवाह नोंदणी करण्यासाठी १८ जुलै ते १६ सप्टेंबरपर्यंत विवाह नोंदणीसाठी वेळ दिला होता. मात्र, माशी कोठे श्ािंकली हे कळायला मार्ग नाही, त्यापूर्वी छायासोबत संबंध आले होते, असे वºहाडेने सांगितले. त्यानंतर दोघेही दिवाळीच्या सुटीमध्ये आपापल्या गावी आले.दरम्यान, छाया गर्भवती असल्याचे तिच्या आई - वडिलांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी छायास मारहाण करून प्रियकराची माहिती जाणून घेतली. ते छायाला घेऊन २५ नोव्हेंबर रोजी आसोदा येथे गेले. मात्र आई - वडील तसेच चुलते आणि आजोबांनी या विवाहास विरोध केल्याचे तो म्हणाला.सध्या आपल्या जवळ पैसे नाहीत असे कारण पुढे करून शुभमने छायाचे वडील समाधान डुकरे यांच्या फोन वर एसमएस केला. त्यात ‘आज तुम्ही येऊ नका’ असा पाठवून फोन बंद केला. त्यामुळे आता छायाचे काय करायचे असा प्रश्न वडील समाधान डुकरे, मावसा महादू उगले आणि अण्णा लोखंडे तसेच आतेभाऊ रामधन दळवी यांना पडला असावा, असेही तो म्हणला. छायाला घरी नेल्यावर समाजात बदनामी होईल या भीतीने २५ नोव्हेंबरच्या रात्री या चौघांनी धावडा मेहेगाव रस्त्यावर तिला गळफास देऊन तिची जीवन यात्रा संपवल्याची बातमी कळ्यावर आपल्या मोठा धक्का बसला आणि तेथेच आमच्या सुखी संसाराचे स्वप्न विरून गेल्याचे शुभम भावूक होऊन सांगत होता. असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मयत छाया डुकरे ही पायाने अपंग होती तर तिचा प्रियकर म्हणवून घेणारा शुभम वºहाडे हा देखील डाव्या हाताने अपंग असल्याचे पोलिसांनी सांगितले. एकूणच एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही भावनिक स्टोरी जरी शुभमकडून सांगितली जात असली तरी, पोलीस यावर कितपत विश्वास ठेवतात, हे पाहणे लक्षणीय ठरणार आहे.
मोबाईल बंद झाल्यानेच आमचे संसाराचे स्वप्न भंग झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 12:38 AM