लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाच्यावतीने वतीने जाफराबाद येथे सलग पाचव्या दिवशी मराठा आरक्षण मागणी साठी आंदोलन सुरूच असून, शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालया समोर सर्व समाज बांधवांनी एकत्र येत जवळपास सातशे कार्यकर्त्यांनी मुंडण करून आरक्षण लागू करण्याची मागणी केली आहे.विशेष म्हणजे या आंदोलनात सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय विचार बाजूला ठेवून या आंदोलनात सहभाग घेतला आहे.मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज जाफराबाद तालुकाच्या वतीने जाफराबादेत सकाळी १० वाजेपासून तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मुंडण आंदोलन केले. या आंदोलनात जाफराबाद तहसील समोर ५१२ पिंपळखुटा येथे ७० तर हिवराबळी ८०, बोरखेडी २०, वाकडे गल्ली १८, माहोरा येथे ५०, युवकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनात मराठा बांधवांनी मुंडण करुन आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात मोठे मुंडण आंदोलन केल्याचा दावा केला आहे. जाफराबाद शहरासह अनेक गावक-यांनी आंदोलनात सहभाग घेतला. सदरील आंदोलन हे सकाळी १० वाजेपासून सायंकाळी सहावाजे पर्यंत सुरू होते. या कामी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या १० हून अधिक समाज बांधवांनी पाठिंबा देत मोलाचे सहकार्य केले आहे.एकूणच या मुंडण आंदोलनामुळे संपूर्ण तालुकाभर याचा वणवा पेटणार असल्याचे सकल मराठा समाजाकडून सांगण्यात आले. त्यामुळे तातडीने आरक्षणचा निर्णय जाहीर करावा अशी मागणी होत आहे.सहा सदस्यांचाराजीनामाजाफराबाद तालुक्यातील सिपोरा अंभोरा येथील नऊ ग्राम पंचायत सदस्यांपैकी सहा ग्राम पंचायत सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे सरपंच, ग्रामसेवकांकडे दिले. यात पुष्पा विजय अंभोरे, सुनील सदाशिव अंभोरे, वैशाली प्रशांत अंभोरे, दिलीप रामकृष्ण अंभोरे, मंगला राजेंद्र अंभोरे, भगवान गिरनारे यांचा समावेश आहे. या राजीनामा अस्त्रामुळे तरी सरकारला जाग येईल, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.
तब्बल ७५० युवकांचे मुंडण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 1:10 AM