बदनापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती लागली आहे. या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. यापूर्वी पडलेला दुष्काळ आणि पाण्यासाठी झालेली गैरसोय पाहता पाईपलाईनला लागलेली गळती थांबवावी, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत. शिवाय शहराला शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली जात आहे.
दहिपुरीत अल्पसंख्याक दिनानिमित्त कार्यक्रम
अंबड : तालुक्यातील दहिपुरी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर शाळेत अल्पसंख्याक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापक एस. यू. मोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संपत निर्मळ, जायभाये, राठोड, उगले, ठाकूर, ढेंबरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पटेल यांनी तर आभार उगले यांनी मानले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना अभिवादन
तीर्थपुरी : येथील परीट समाजाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवाजी बोबडे, तात्यासाहेब चिमणे, चंद्रकांत पवार, रमेशचंद्र बोबडे, लक्ष्मण खंडागळे, जुगलकिशोर चांडक, रमेश बोबडे, डॉ. प्रवीण कडूकर, कैलास जारे, अंकुश बोबडे, रामप्रसाद बोबडे, काळू वानखेडे, बंडू खंडागळे, जनार्दन बारोकर आदींची उपस्थिती होती.