जालना : नवीन वर्षाचे स्वागत करण्यास यंदा निर्बंधाचे बंधन ठेवण्यात आले आहे. यामुळे नेहमीसारखा जल्लोष पाहयला मिळणार नाही. कोरोना परिस्थितीनंतर शासनाने अनेक बाबतीत निर्बंध ठेवले आहेत. यातच हॉटेल आणि ढाबा यांना वेळेची मर्यादा घालण्यात आली आहे. यामुळेच नवीन वर्षाचे स्वागताला उत्तर रात्रीच्या मर्यादा ठेवण्यात आलेल्या आहेत.
रामनगर येथे ३६ हजारांची घरफोडी
जालना : जालना तालुक्यातील रामनगर येथे चोरट्यांनी घराचे कुलूप तोंडून विक्रीसाठी आणलेल्या साड्या व रोख रक्कम लंपास केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. चोरट्यांनी साड्या व रोख बारशे असा ३६ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी डॉ. राजकुमार जैन यांच्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सय्यद मजीद करीत आहे.
वाळू पट्ट्यांच्या लिलावाचा मार्ग मोकळा
जालना : लॉकडाऊनमुळे रखडलेले जिल्ह्यातील ४३ वाळू पट्ट्यांचे ऑनलाईन लिलाव करण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, त्यासंबंधीची प्रक्रिया जिल्हा गौण खनिज विभागात वेगाने सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसात ऑनलाईन लिलाव होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. लॉकडाऊन काळात राज्यस्तरीय पर्यावरण समितीची बैठक झाली नव्हती. त्यामुळे लिलाव रखडले होते.
जालन्यात जिनिंगमध्ये लागली आग
जालना : औद्यागिक वसाहत येथील मुलचंद फुलचंद जिनिंगमध्ये मंगळवारी अचानक आग लागली. सुदैवाने अग्निशामक दलाच्या पथकाच्या परिश्रमामुळे ही आग तात्काळ आटोक्यात आली. त्यामुळे मोठी आर्थिकहाणी टळली. आग्निशामक दलाच्या दोन बंबाच्या मदतीने ही आग तत्काळ जवानांनी आटोक्यात आणली. दरम्यान, आगेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
बेपत्ता तरूणाचा आढळला मृतदेह
भोकरदन : तालुक्यातील आडगाव भोंबे येथील युवक दोन दिवसांपासून बेपत्ता होता. दरम्यान मंगळवारी त्याचा गावाशेजारील एका विहिरीत मृतदेह आढळून आला. कामानिमित्त बाहेर जाऊन येतो, असे सांगून घराबाहेर पडलेला संतोष उत्तम भोंबे (वय २३) हा दोन दिवस बेपत्ता होता. तो दुसऱ्या दिवशीही घरी न परतल्याने नातेवाईकांनी पारध पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.