मंठा : येथील पुजा वाघमारे हिने बीडीएसच्या (दंतवैद्यक शास्त्र) परीक्षेत अंतिम वर्षात प्रथम श्रेणीत यश संपादित केले आहे. तिने अहमदनगर येथील यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटलमधून बीडीएसची पदवी प्राप्त केली. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
माजी मंत्री हंसराज अहिर यांचा सत्कार
जालना : शहरातील सतकरनगर मधील सुयश लॉनमध्ये गवळी समाज संघटनेच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष हिरामनअप्पा गवळी, अशोक भाले, अशोक मंडले, उमाकांत जोमिवाले, वसंत गवळी, कासम गवळी, बाबूराव सतकर, सुनील पहेलवान खरे आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय हिंदी विद्यालयात गणित दिन साजरा
जालना : शहरातील राष्ट्रीय हिंदी विद्यालयात राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला. यावेळी गणित शिक्षक प्रल्हाद सुरडकर यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याचा परिचय दिला. यावेळी जितेंद्र नरवैये, अजित बाराहाते, वसंत शिंदे आदींनी प्रश्नमंजुषेत सहभाग घेतला. यावेळी मुख्याध्यापक मनीष अग्रवाल, गिरीश दशरथ आदींची उपस्थिती होती.
कारवाईची मागणी
जालना : तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री सुरू आहे. दारूमुळे युवा पिढी व्यसनाधीन होत असून,भांडण- तंट्यात वाढ होत आहे. ग्रामीण भागातील धाब्यांवरही खुलेआम दारूविक्री केली जात आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
महावितरणकडून जागृती
जालना : महावितरणच्या वतीने ग्राहकांच्या समस्या सोडिवण्यासाठी शहरात एक दिवस एक वॉर्ड योजना राबविण्यात येत आहे. शहरातील रामनगर, गांधीनगर, बाजारपेठ परिसर, शिवाजी चौक, गोपीकिशननगर, पेन्शनपुरा, दत्तनगर, नाथनगर आदी भागात ही मोहीम राबिवण्यात आली.