लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बोंडअळीमुळे जिल्ह्यातील दोन लाख ७९ हजार ५३९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाकडून प्रगतिपथावर आहे. आतापर्यंत दोन लाख ४१ हजार शेतक-यांच्या एक लाख ५८ हजार ७४६ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत.शेतकºयांसाठी नगदी पीक असलेल्या कपाशीचे यंदा बोंडअळीमुळे नुकसान झाले. पहिल्या व दुस-या वेचणीनंतर शेतात कापूसच राहिला नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतक-यांचे यंदा मोठे नुकसान झाले आहे. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईची मागणी जोर धरू लागल्यानंतर कृषी विभागाने शेतकºयांकडून सुरुवातीला ‘जी फॉर्म’ भरून घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बाधित कपाशी क्षेत्राचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश हिवाळी अधिवेशनात दिले. शेतक्यांना हेक्टरी सुमारे तीस हजारांची मदतही जाहीर केली. त्यानंतर मागील तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात कृषी व महसूल यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतात जाऊन बाधित कपाशी क्षेत्राचे पंचनामे केले जात आहे. यासाठी प्रथम मोबाईल अॅपचा वापर केला जात असून, बाधित कपाशी पिकाचा फोटो घेणे कृषीसेवक व तलाठ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्वच कपाशी क्षेत्र पूर्णत: बाधित झाल्यामुळे अपु-या कर्मचा-यांवर पंचनामे पूर्ण करताना कृषी व महसूल विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. गुरुवारअखेर जिल्ह्यातील एक लाख ५८ हजार ७४६ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित एक लाख २० हजार ७४६ हेक्टरवरील कपाशी क्षेत्राच्या पंचनाम्याचे काम प्रगतीपथावर आहे. पुढच्या हंगामात कपाशीवर बोंडअळी होऊ नये याकरिता कपाशी पीक उपटून टाकण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मात्र, तब्बल सव्वा लाख हेक्टरवरील पंचनामे अपूर्ण असल्याने शेतकरी कपाशी ठेवावी की उपटून टाकावी या संभ्रमावस्थेत आहेत. घनसावंगी तालुक्यात कपाशी पीक उपटून ऊस लागवड केली आहे.
पंचनामे प्रगतिपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 1:05 AM