जालना : कोरोना होऊन गेलेल्या शून्य ते पंधरा वर्षे वयोगटातील बालकांना पोस्ट कोविडमध्ये एमआयएस आजार होऊ नये यासाठी पालकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.
लहान मुलांनाही कोरोनाची लागण होत असल्याच्या अनेक केसेस समोर आल्या आहेत. कोरोनामुक्त बालकांची दीड ते दोन महिने तज्ज्ञांच्या सूचनेनुसार काळजी घेणे गरजेचे आहे. काळजी न घेतल्यास मुलांना एमआयएस आजार होऊ शकतो. त्यामुळे कोरोनामुक्तीनंतरही मुलांना ताप येण्यासह इतर त्रास होत असेल तर तात्काळ तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत.
१५ वर्षांखालील मुलांची काळजी महत्त्वाची
मागील दीड वर्षात १५ वर्षाखालील अडीच हजारावर बालकांना कोरोनाची बाधा झाली आहे.
सद्यस्थितीत काही मोजके रुग्ण असल्याचे दिसून येत आहे.
काही बालके कोरोनामुक्त झाली आहेत. अशा बालकांची पालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
या लक्षणांकडे असू द्या लक्ष
पाच दिवसांपेक्षा अधिक ताप
अंगावर पुरळ उठणे
डोळ्याच्या बाजूला लाल होणे
शरीरावर सूज येणे
बालकांची शुद्ध कमी होणे
याशिवाय इतर शारीरिक त्रास
बालरोगतज्ज्ञ म्हणतात
कोनोनामुक्तीनंतर बालकांची पुढील दीड ते दोन महिने काळजी घ्यावी. औषधोपचार वेळेवर देण्यासह सकस अन्न द्यावे. काही त्रास असेल तर तज्ज्ञांमार्फत उपचार घेणे गरजेचे आहे.
- डॉ. नंदकुमार पालवे
बालकांना कोरोनाची लागण होऊच नये यासाठी पालकांनीच अधिक काळजी घ्यावी. मास्कचा वापर, निर्जंतुकीकरण, बाहेरून घरी गेल्यानंतर स्वच्छता आदी सूचनांचे पालन करावे.
- डॉ. पीयूष होलानी