शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

पावणेदोन लाख घेऊन नववधू झाली पसार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 5:29 AM

पावणेदोन लाखांचे दागिने आणि नोंदणी शुल्क घेऊन वधू-वर सूचक केंद्र चालकाच्या मदतीने तिने विवाह केला.

बदनापूर (जि. जालना) : पावणेदोन लाखांचे दागिने आणि नोंदणी शुल्क घेऊन वधू-वर सूचक केंद्र चालकाच्या मदतीने तिने विवाह केला. हात नाही लावायचा, म्हणत तीन दिवस नखरे दाखविले आणि रात्री साडीच्या आधाराने गच्चीवरून पसार झाली. ही एखाद्या चित्रपटाची कथा नव्हे, तर हिवरा येथे हा प्रकार घडला असून याप्रकरणी वधू-वर सूचक केंद्र चालकासह तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.जालना तालुक्यातील हिवरा येथील अठ्ठावीस वर्षीय युवकाने लग्नासाठी स्थळ मिळावे याकरिता तालुक्यातील कंडारी बु. येथील खाडे वधू-वर सूचक केंद्राशी संपर्क साधला. कुठल्याही जाती-धर्माची मुलगी असली तरी चालेल, असे त्याने वधू-वर सूचक केंद्र संचालकास सांगितले व तशी नोंदही त्याच्याकडे केली. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांनी या केंद्राकडून त्यांना बोलावण्यात आले. लवकरच स्थळ सुचविण्यात आल्याने तो ‘देवच पावला’ या भावनेने लगबगीतच आपल्या आई-वडिलांसह कंडारी येथे गेला. तेथे सातपूर (जि. नाशिक) येथील एक मुलगी बघितली. मुलगी पसंद असल्याचे त्यांना सांगिंतले. त्यानंतर केंद्र चालकाने एक लाख साठ हजार रुपये शुल्क आणि वधूच्या अंगावर २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घालावे लागतील असे सांगितले. वर पक्षाने तयारी दर्शविली.