जालना/घनसावंगी : जिल्ह्यात ३७८ कोटी असलेली वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी मंठा व घनसावंगी तालुक्यातील पंधरा गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.जालना जिल्ह्यात वीज बिलाच्या थकबाकीचे प्रमाण अधिक आहे. मार्चअखेर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरणने धडक वसुली मोहीम सुरू केली आहे. विद्युत विभागाचे पथक थेट गावात वसुली करताना दिसून येत आहे. ज्या गावांमधून वसुलीस काहीच प्रतिसाद मिळत नाही, अशा गावांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. मंगळवारी घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी विभागांतर्गत येणाºया जोगलादेवी, गणेशनगर तांडा, कोठी वस्ती, राणी उंचेगाव विभागातील पराडा, मुढेगाव, कुंभार पिंपळगावमधील विरेगाव तांडा, घाणेगाव, उक्कडगाव, गणेशनगर, रांजणी भागातील बोरगाव या गावांचा वीजपुरठा खंडित करण्यात आल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता एस. धोपकर यांनी दिली. या भागात एकूण ६९ लाख ६० हजारांची थकबाकी असून, मंगळवारी ५२० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मंठा तालुक्यातील काही गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.-----------जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेली थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. थकबाकीदार ग्राहकांनी आपल्याकडील वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे.सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, महावितरण, औरंगाबाद.-------------------
बिल भरा, नाही तर गावात अंधार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:56 AM