शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

चोरावर मोर फसवणूक करणाऱ्याचे बेरोजगार तरुणांनी केले अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:26 AM

फोटो सदर बाजार पोलिसांची कारवाई; सातारा येथून ९ आरोपींना अटक जालना : नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना लाखो रुपयांना लुटणाऱ्याचे ...

फोटो

सदर बाजार पोलिसांची कारवाई; सातारा येथून ९ आरोपींना अटक

जालना : नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना लाखो रुपयांना लुटणाऱ्याचे अपहरण करून त्याला सातारा येथे घेऊन गेलेल्या नऊ जणांना सदर बाजार पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. वैभव भैरू पाटील (वय २१, रा. तिरपण्या, जि. कोल्हापूर), सतीश गराडे (वय २३, रा. आमनेवाडी, जि. कोल्हापूर), प्रशांत संभाजी पवार (वय २९, रा. करंजोशी, जि. कोल्हापूर), पुष्पराज मारुती जाधव (२६, रा. युलूर, जि. सांगली), वैभव भास्कर शेशवारे (३५, रा. अगरण धुळगाव, जि. सांगली), मनोहर भास्कर शेशवारे (४२, रा. अगरण धुळगाव, जि. सांगली), नितीन बाळू दाढे (२३, रा. वाफळे, जि. सोलापूर), गणेश पांडुरंग दाढे (२९, रा. वाफळे, जि. सोलापूर), शरद बाळू दाढे (२५, रा. वाफळे, जि. सोलापूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून टाटा सुमो गाडी जप्त करण्यात आली.

विठ्ठल विजयसिंग जारवाल (रा. राजेवाडी, ता. बदनापूर) हा १४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी साडेअकरा वाजता आपल्या मित्रासोबत जालना येथील बसस्थानकात उभा होता. तेव्हाच नऊ जणांनी त्याला मारहाण करून गाडीत बसवले. त्यानंतर त्याला आरोपी गाडीत घेऊन गेले. याप्रकरणी तरुणाच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही तपासून गाडीचा क्रमांक काढला. अपहरणकर्ते अंबड, पैठण, शेगावमार्गे जात असल्याची माहिती मिळाल्याने सातारा व कोल्हापूरकडे पथके रवाना करण्यात आली. पोनि. देशमुख यांनी अहमदनगर, सातारा, कोल्हापूर येथील नियंत्रण कक्षास कळविले होते. सातारा पोलिसांनी संबंधित युवकांचे फोन नंबर ट्रेस करून अपहरण झालेल्या युवकाची सुटका केली. यावेळी नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. संजय देशमुख, कर्मचारी कैलास खार्डे, समाधान तेलंग्रे, फुलचंद गव्हाणे, सुधीर वाघमारे, योगेश पठाडे यांनी केली.

नोकरी लावून देतो म्हणून घेतली मूळ कागदपत्रे

अपहरण झालेला विठ्ठल जारवाल हा सातारा येथील बहिणीच्या घरी गेला होता. तेव्हाच येथील वैभव शेशवारे याच्यासोबत त्याची ओळख झाली. यावेळीच माझे नातेवाईक दिल्ली येथे मंत्री आहेत. त्यांच्याकडून तुला सरकारी नोकरी लावून देतो. आम्ही डमी उमेदवार बसवून परीक्षा पास करून घेतो, असे सांगून जारवालने संबंधित तरुणाची मूळ कागदपत्रे घेतली. नंतर जारवाल हा टाळाटाळ करीत असल्याने वैभव शेशवारे याने त्याला कागदपत्रांची मागणी केली. तुला कागदपत्र पाहिजे असेल तर मला पैसे दे, असे म्हणून जारवालने वेळोवेळी पैसेसुद्धा घेतले; परंतु तरीही त्याने कागदपत्र देण्यास टाळाटाळ केली. नंतर जालना येथील बसस्थानकात बोलावून त्याचे अपहरण केले.

अपहरण केलेल्या तरुणाकडून कागदपत्रे जप्त

सर्व आरोपी हे सातारा येथे सिक्युरिटी म्हणून काम करतात. सरकारी नोकरी मिळण्यासाठी त्यांनी अपहरण झालेल्या इसमास मूळ कागदपत्र दिली होती. जारवाल याने आरोपींकडून लाखो रुपये घेतल्याचेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी जारवाल याच्याकडून संबंधित तरुणांची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. विठ्ठल जारवालविरुद्ध आरोपीही फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.