चौकट
या बँकांनी वाटले कमी कर्ज
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १ हजार १८९ कोटी रुपयांची तरतूद पीककर्ज वाटपासाठी केली होती. त्यापैकी ४४ हजार शेतकऱ्यांना १७२ कोटी ३५ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. ज्या प्रमुख बँकांनी कमी कर्ज वाटप केले आहे. त्यात बँक ऑफ बडोदा १ टक्का, बँक ऑफ इंडिया ४ टक्के, महाराष्ट्र बँक १२ टक्के, कॅनरा बँक ३ टक्के, सेंट्रल बँक ऑफ इंडिया २ टक्के, युनियन बँक १ टक्का, इंडियन ओव्हरसीज बँक ३२ टक्के, पंजाब नॅशनल बँक ६ टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया ४ टक्के, एचडीएफसी ७ टक्के, आयसीआयसीआय ६ टक्के, आयडीबीआय ७ टक्के, महाराष्ट्र ग्रामीण बँक ११ टक्के, युनियन बँक ऑफ इंडिया ५ टक्के, एक्सीस बँक ० टक्के, कोटक बँक ० टक्के, असे वाटप केले आहे. ज्या बँकांनी अत्यल्प वाटप केले आहे, त्यांच्या विभागीय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी गती वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.