लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एकीकडे दिवसभर अंगातील थंडी संपण्याचे नाव घेत नाही. असे असताना शहरातील अनेक विवाह समारंभ, रिसेप्शन कार्यक्रमातून सर्वात जास्त डिमांड असल्याचे दिसून आले. जालन्याचा पारा नऊ अंशांवर येऊन ठेपला असून, दिवसाही अंगातील स्वेटर निघत नसल्याचे वास्तव आहे.असे असतानाही शहरातील अनेक विवाह समारंभातून कुल्फीला मोठी मागणी असल्याचे दिसून आले. सर्वात जास्त गर्दी ही कुल्फीच्या स्टॉलवर होत असल्याचे पाहावयास मिळाले. थंडीचा परिणाम ज्या प्रमाणे माणसांवर होत आहे, तसाच तो निसर्गातील अन्य प्राण्यांवर होत असल्याचे दिसून आले. शहरात रात्री कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी असतात आणि दुचाकी तसेच चारचाकी चालकांच्या ते मागे लागतात, मात्र गेल्या चार दिवसांपासून कंपनीतून येणारे कामगार तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना कुत्र्यांचा त्रास जाणवला नाही.
कडाक्याच्या थंडीतही कुल्फीवर वºहाडींच्या उड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 12:35 AM