लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कीटकनाशकांची फवारणी करताना आवश्यक ती दक्षता न घेतल्याने जालना जिल्ह्यातील ४४ शेतकऱ्यांना बाधा झाली आहे. न कळत शरीरात गेलेल्या कीटकनाशकांमुळे बाधा झालेले ४४ रूग्ण गत २० दिवसात जालना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. यातील ३८ जणांवर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले असून, प्रकृती गंभीर असल्याने ६ जणांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील रूग्णालयात रेफर करण्याची वेळ जिल्हा रूग्णालय प्रशासनावर आली होती.रासायनिक खते, कीटकनाशकांच्या अमर्याद वापरातून उत्पादित होणाºया अन्नधान्यातून मानवी जीवनावर परिणाम झाला आहे. सेंद्रीय खतांचा वापर व्हावा, यासाठी जनजागृती केली जाते. मात्र, यातून फारसे निष्पन्न होत नाही. रोगराईचा प्रादुर्भाव कमी व्हावा, उत्पादन हाती मिळावे, यासाठी दुष्काळात होरपळणारा जालना जिल्ह्यातील शेतकरी रासायिक खते, कीटकनाशकांचा वापर करीत आहे. त्यात पावसाचा लहरीपणा, बदलत्या वातावरणामुळे गत महिन्यापासून पिकांवर अळ्या, रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे.हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी रासायिक कीटकनाशके फवारणी करीत आहेत. मात्र, ही फवारणी करताना आवश्यक ती दक्षता न घेतल्याने ४४ शेतक-यांच्या शरीरात कीटकनाशके जाऊन त्यांना बाधा झाली आहे. कीटकनाशकामुळे बाधा झालेले ४४ शेतकरी गत २० दिवसात जिल्हा रूग्णालयातील अंतररूग्ण विभागात उपचारासाठी दाखल झाले होते. पैकी ३८ जणांवर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले. तर प्रकृती अत्यावस्थ असलेल्या ६ जणांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद रेफर करण्यात आले आहे.पिकांवरील अळ्यांचा, रोगराईचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी मरमर करणारा शेतकरी कीटकनाशक फवारताना मात्र, आवश्यक ती दक्षता घेत नसल्याचेच यावरून दिसून येत आहे. न कळत कीटकनाशक शरीरात जात असल्याने शेतक-यांचा जीवही धोक्यात येत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.अंबड, घनसावंगीतील अधिक शेतकरीजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल होणा-या शेतक-यांमध्ये अंबड, घनसावंगी तालुक्यातील रूग्णांची संख्या अधिक आहे.जालना येथील शासकीय रूग्णालयातील ही आकडेवारी असून, खासगी रूग्णालयात दाखल होणा-या रूग्णांची संख्याही मोठी असल्याचे सूत्रांनी सांगितले.अशी घ्यावी दक्षताहातात मोजे घालावेत, तोंडाला रूमाल बांधवा, शरीर झाकावेदोन किंवा अधिक कीटकनाशके एकत्रित करून फवारणी करू नयेउपाशीपोटी फवारणी करू नयेवा-याच्या विरूध्द दिशेने फवारणी करावीआजारी व्यक्तीने फवारणी करू नयेमद्यपान केलेल्या व्यक्तीने फवारणी करू नयेसकाळी किंवा सायंकाळी फवारणी करावीकृषी विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे
४४ शेतकऱ्यांना कीटकनाशकांची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:50 AM