ठळक मुद्देपाच संशयित ताब्यात
जालना : शहरातील प्लॉटिंग व्यावसायिक नितीन ताराचंद कटारिया (३९) यांचा तीक्ष्ण हत्याराने खून केल्याची घटना मोदीखाना भागात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे.मारेकºयांना अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त जमावाने कटारिया यांचा मृतदेह सदरबाजार पोलीस ठाण्यात आणल्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला. याप्रकरणी दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दुपारी चारच्या सुमारास मोदीखाना परिसरातील रुपानिवास येथे दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने त्यांना घराबाहेर बोलाविले. कटारिया बाहेर आल्यानंतर काही कळायच्या आतच त्याने कटारिया यांच्या गळ्यावर, पोटावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कटारिया यांना स्वत:चा बचाव करण्याची संधी मिळाली नाही. ते घरासमोरील रस्यावरच रक्ताच्या थोराळ्यात पडले. त्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून (क्र.११११) फरार झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. स्थानिक नागरिकांनी जखमी कटारिया यांना तात्काळ येथील विवेकानंद हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त जमावाने कटारिया यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून सदर बाजार पोलीस ठाण्यात आणला. संशयितांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ठाण्यातून नेणार नाही, असे भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला.
या प्रकरणी मृत कटारिया यांचे वडील ताराचंद कटारिया यांच्या फिर्यादीवरून संशयित सुनील रुपा खरे (३५, रा. खवामार्केट), चंदू धन्नू घोचिवाले (३२), अब्दुल रहीम सत्तार खान उर्फ सादेक खान (४२, रा.राममुर्ती) शकील बुरान घोचिवाले (३०), हमीद बुरान घोचिवाले (२७) सलीम बुरान घोचिवाले (३०), अफजल लल्लू मुन्नीवाले (२६), अकबर बुरान घोचिवाले यांच्यासह एक महिला व अज्ञात मारेकºयाविरुद्ध खुनाचा कट रचने व खून करणे या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतल्याचे सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी सांगितले.काय आहे प्रकरण?प्लॉटिंग व्यावसायिक असणाºया नितीन कटारिया यांची खरपुडी शिवारात जमीन आहे. सहा महिन्यांपूर्वी सुनील खरे, चंदू घोचिवाले व अब्दुल रहीम सत्तार यांनी कटारिया यांना मारहाण करून पन्नास लाखांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार कटारिया यांनी पोलिसांकडे केली होती. मात्र, गुन्हा दाखल होण्यास विलंब झाल्याने कटारिया यांनी कोर्टात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशाने वरील संशयितांवर सोमवारी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यांनतर दुसºयाच दिवशी कटारिया यांचा खून झाला.
पोलिसांकडे मागितले होते संरक्षणनितीन कटारिया यांना वारंवार धमक्या येत होत्या. त्यामुळे एक दिवस माझाही गोविंद गगराणी होईल, मला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी कटारिया यांनी पोलिसांकडे केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष झाले. पोलिसांनी वेळेत संरक्षण दिले असते तर हा प्रकार घडलाच नसता, अशी भावना व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.