लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : एका फायनान्स कंपनीच्या शाखाधीका-याच्या दुचाकीला अडवून डोळ्यात मिरचीची पूड टाकून दोन अनोळखी इसमांनी सव्वा चार लाख रुपये लंपास केल्याची घटना राजूर जवळील कोठा फाट्याजवळ सोमवारी भर दुपारी घडली. लुटमारीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.महिन्द्रा रूरल हाउसिंग सोसायटीने राजूर परिसरात घराच्या बांधकामासाठी कर्ज वितरण केलेले आहे.सदर कर्जाची दरमहा वसुली केली जाते. कर्जदाराकंडून वसूली करण्यासाठी सोमवारी शाखाधिकारी सतीश घोडे हे या भागात आले होते. त्यांनी काही जणांकडून दरमहा असलेल्या कर्जहप्ता वसुली करून जवखेड्याहून राजूरकडे येत असताना कोठा फाट्याजवळ अनोळखी दोन व्यक्तींनी त्यांची मोटारसायकल अडवून त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून घोडे यांच्या जवळ असलेले चार लाख २८ हजार रुपये घेऊन पोबारा केला.घटनेची माहिती मिळताच हसनाबाद ठाण्याचे स.पो.नि.सीताराम मेहेत्रे यांनी कर्मचा-यांसह घटनास्थळी धाव घेतली.शाखाधिकारी घोडे यांच्यावर जालन्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.याप्रकरणी राजूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत उबाळे, प्रशांत लोखंडे, गणेश मान्टे, प्रताप चव्हाण, संतोष वाढेकर हे करीत आहेत.
डोळयात मिरची पूड टाकून सव्वाचार लाख लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:21 AM