लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : मेंढपाळाच्या शेकडो मेंढ्या शेतात चरत - चरत शहराजवळ येत असताना अज्ञात पदार्थ खाण्यात आल्याने काही मेंढ्या चक्कर येऊन रस्त्याच्या कडेला पडून काही वेळातच दगावल्या. जवळपास शंभर च्या आसपास मेंढ्या आतापर्यंत दगावल्या असून, अजूनही काही मेंढ्या अस्वस्थ आहेत. त्या वाचण्याची शक्यता नसल्याचे दिसून येत आहे.ज्ञानेश्वर बारकू शिंगाडे (रा. कासारी ता. नांदगाव जि. नाशिक) असे मेंढपाळाचे नाव असून मेंढ्या शेतात बसवून शेतीला खत मिळते, त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करतात. त्यांच्याकडे शेकडो मेंढ्या असून सोमवारी बरंजळा लोखंडे येथून मेंढ्या घेऊन भोकरदन शहराजवळ येत असताना नांजा पाटीजवळ काही मेंढ्या अचानक चक्कर येऊन खाली पडल्या व दगावल्या. दरम्यान, संध्याकाळी पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अस्वस्थ असलेल्या मेंढ्यांवर उपचार केले.अधिकारी फिरकलेच नाहीतघटनास्थळी अजूनही मेंढ्या दगावत असून कालपासून आजपर्यंत एकाही शासकीय अधिकाºयांनी घटनास्थळी भेट दिली नसल्याचे मेंढपाळ ज्ञानेश्वर शिंगाडे यांनी सांगितले.तसेच मेंढपाळाचे जवळपास दहा लाखांच्या आसपास नुकसान झाल्याचा अंदाज असून या मेंढ्यांवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्याने शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी मेंढपाळ शिंगाडे यांनी केली आहे.
विषबाधा होऊन १०० मेंढ्या दगावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 1:05 AM