लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील विविध नद्यांच्या पात्रात अवैधरित्या वाळू उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांविरूध्द भोकरदन पोलिसांनी मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळी कारवाई केली. यावेळी जवळपास साडेनऊ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तिघांविरूध्द भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोनि दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली भोकरदन- बाभूळगाव रोडवर, निंभोळा शिवारात, सिपोरा बाजार शिवारात कारवाई करण्यात आली. यात मंजूर मुन्शी शहा (रा. दावतपूर ता.भोकरदन) याच्याकडील वाळूसह ट्रॅक्टर जप्त असा अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.निभोळा गावाजवळ आदिनाथ उत्तम निर्मळ (रा. निंभोळ) याच्या ताब्यातील एक ट्रॅक्टर व वाळू असा ५ लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर बुधवारी सकाळी सिपोरा बाजार शिवारात ट्रॅक्टरचालक किशोर कडूबा कड (रा. सिपोरा बाजार) याच्याविरूध्द कारवाई करून ट्रॅक्टर, वाळूसह एक लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि दशरथ चौधरी, पोहेकॉ मिलिंद सुरडकर, पोना रूस्तम जैवाळ, पोकॉ विजय जगताप, पोकॉ जगन्नाथ जाधव, पोकॉ समाधान जगताप, पोकॉ गणेश निकम, संजय क्षीरसागर आदींच्या पथकाने केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे तालुका व परिसरातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.
वाळू तस्करांविरुद्ध पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 1:12 AM