लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुचाकी आडवी लावून सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना अंबड तालुक्यातील खादगाव फाट्याजवळ १६ जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणात चंदनझिरा पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून दुचाकीसह ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. साईनाथ हिवाळे, आदर्श संदीपान हिवाळे (खादगाव, ता. बदनापूर), कैलास विजय भालेराव (जुंबडा ता. देऊळगावराजा), आदेश राजू जाधव (आंबेडकर नगर कन्हैयानगर, जालना) अशी आरोपींची नावे आहेत.या प्रकरणात मनेश प्रभाकर म्हस्के (आन्वी) यांनी दिलेल्या फियार्दीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असतांना पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना माहिती मिळाली की, लुटमार करुन पळालेला एकजण याच परिसरातील शेतात थांबलेला असल्याची माहिती मिळाली होती.या माहितीवरुन साईनाथ हिवाळे याला ताब्यात घेतले. हा गुन्हा आदर्श हिवाळे, कैलास भालेराव, आदेश जाधव यांच्या मदतीने केला असल्याची कबूली दिली.या आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अधिक तपास सुनिल इंगळे हे करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधिक्षक एस. चैतन्य, अपर पोलिस अधिक्षक समाधान पवार, डीवायएसपी शिलवंत ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय बाळासाहेब पवार, एपीआय सुनिल इंगळे, प्रमोद बोंडले, कर्मचारी अिनल काळे, कृष्णा भडांगे, भरत कडूळे, परमेश्वर हिवाळे यांनी केली.
लुटमार करणारे पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:30 AM