लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्हा पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी कोम्बिंग आॅपरेशन राबवले. ही कारवाई सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर आणि त्यांचे सहकारी हे जालन्यातील शिकलकरी मोहल्याल आरोपींचा शोध घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी मध्यरात्री १२.४० वाजेच्या दरम्यान तेजसिंग नरसिंग बावरी आणि त्याचे वडील नरसिंग बावरी यांनी लोखंडी घण आणि कोयत्याने गौर यांच्यावर हल्ला केला. मात्र, गौर यांनी प्रसंगावधान राखून वाचले.जिल्ह्यातील वाढत्या चोऱ्या आणि दरोडे रोखण्यासाठी पोलीसांनी विशेष तपास अभियान हाती घेतले आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील विविध संशयित भागात पोलिसांनी एकाच वेळी ही कारवाई केली. त्यात अंबड तसेच अन्य तालुक्यात झालेल्या घरफोडी तसेच चोरी प्रकरणातील अनेक आरोपी पोलीसांच्या जाळ्यात अडकेले आहेत. ही तपास मोहीम सुरू असतानाच जालन्यातील शिवाजीपुतळा भागातील शिकलकरी मोहल्ला भागात पोलीस निरीक्षक गौर व त्यांचे पथक आरोपींचा शोध घेत होते.त्यावेळी कुख्यात दरोडेखोर तेजसिंग बावरी याच्या घरी पोहचले असता, त्यांनी घराची झडती घेण्यासाठी दारावर थाप मारली. त्यावेळी कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. पोलिसांनी थेट पोलिसी खाक्या दाखवत दार उघडले. त्यावेळी तेजसिंग हा दारूच्या नशेत पलंगाखाली लपून बसल्याचा संशय पोलीस निरीक्षक गौर यांना आल्याने त्यांनी पलंगाखाली कोण आहे, हे पाहू द्या अशी विनंती तेजसिंगचे वडील नरसिंग यांच्याकडे केली. मात्र घरात कोणी नसल्याचे सांगितले. मात्र गौर यांनी खाली वाकून पाहिले असता, कुख्यात आरोपी तेजसिंग हा लपल्याचे दिसून आले. त्याने गौर यांना पाहताच त्याच्या जवळ असलेल्या लोखंडी घणाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच वडील नरसिंग बावरी यांनी देखील कोयत्याने गौर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेही गौर यांच्या पथकातील अन्य सहका-यांनी लगेचच तेजसिंग आणि त्याचे वडील नरसिंग यांच्यावर झडप मारून त्यांना ताब्यात घेऊन चांगलाच चोप दिला. त्यांच्याकडून हल्ला करण्यासाठी वापरलेला लोखंडी घण आणि कोयता जप्त करून त्यांना अटक केली. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती देण्यात आली. रात्री ही घटना कळल्यावर लगेचच अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी ढवळे यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात येऊन गौर यांची विचारपूस केली. यावेळी पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोलीस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, कर्मचारी कुरेवाड, देशमुख, बगाटे, हजारे, फलटणकर, मोरे, जाधव, जगताप आदींची उपस्थिती होती.दबंग : थेट कारवाईने खळबळजालना जिल्ह्यात सोमवारी रात्री कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात आले. त्यात जवळपास २२१ वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच रेकॉर्डवरील ३५ गुन्हेगार तपासण्यात आले. २१ समन्स बजावण्यात आलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यात आल्याची माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी दिली. या कारवाईत अंबड तालुक्यातील चोरी, घरफोडी प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतले आहे, परंतु त्यांच्याकडून आणखी माहिती घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.हात फॅ्रक्चर असताना कारवाईगेल्या महिन्याभरापासून पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर आहे. अशाही स्थितीत त्यांनी सोमवारी मध्यरात्री कुख्यात आरोपी तेजसिंग याने केलेला हल्ला परतवून लावत पोलिसी खाक्या दाखवला. हल्ला केल्यानंतर तेजसिंग पळून जाण्याच्या बेतात असताना गौर व त्यांच्या सहका-यांनी त्याला तेथेच डांबून ठेवले.
पोलीस पथकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:38 AM