लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठवाड्यातील बीड, जालना आणि औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी अचाकन कोम्बींग आॅपरेशन सुरू केले आहे. यामध्ये गुन्हेगारी वस्त्यांची झाडाझडती पोलीस करत आहे. या आॅपरेशनमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा आहे.मागील काही दिवसापासून गोंदी, अंबड, वडीगोंद्री परिसरातील गावांमध्ये चोरी व दरोड्याच्या घटना वाढल्या होत्या. या घटना कमी होण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याळ यांच्या आदेशानुसार शनिवारी जालना, बीड, औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी एकत्रित येत कोम्बींग आॅपरेशन सुरु केले आहे. शनिवारी दुपारी १२ वाजल्यापासूनच हे आॅपरेशन सुरू करण्यात आलेले असून, रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत हे आॅपरेशन सुरु राहणार आहेत. यात अंबड, शहगड, वडीगोद्री, घनसावंगी, पाचोड, वडीगोद्री, तलवाडा, गेवराई यासह आदी गावांची झाडाझडती घेतली. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गौर, एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी महिला या आॅपरेशनमध्ये सहभागी आहेत.
जालन्यात पोलीसांकडून आरोपींची शोध मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:17 AM
मराठवाड्यातील बीड, जालना आणि औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी अचाकन कोम्बींग आॅपरेशन सुरू केले आहे. यामध्ये गुन्हेगारी वस्त्यांची झाडाझडती पोलीस करत आहे. या आॅपरेशनमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा आहे.
ठळक मुद्देआठ संशयीत ताब्यात : महानिरीक्षकांचे निर्देश, कोम्बिंग आपरेशन सुरू