लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील कैकाडी मोहल्ला येथे अवैधरीत्या सुरू असलेल्या हातभट्टीवर स्थानिक गुन्हेशाखेने कारवाई करत २ हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना खबऱ्यामार्फेत माहिती मिळाली की, शहरातील कैकाडी मोहल्यात अवैध रित्या हातभट्टी दारु तयार करण्यात येत आहे. या माहितीवरून त्यांनी पथकासह कैकाडी मोहल्ला येथे छापा टाकून दोन ठिकाणच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. यावेळी मानवी शरीरास घातक असणारे ७० हजार रुपयाचे पदार्थ व रसायन जप्त करण्यात आले.या प्रकरणी कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउप. अधीक्षक राहुल गायकवाड, पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोहेकॉ संतोष सावंत, हरिभाऊ राठोड, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, समाधन तेलंगे, पो कॉ.सदाशिव राठोड, लखन पचलोरे, परमेश्र्वर धुमाळ, रवी जाधव, मंदा नाटकर यांनी केली.पोलिसांचा दोन ढाब्यावर छापाजालना : विना परवाना दारु विक्रीवर करत असलेल्या शहरातील दोन ढाब्यांवर छापा मारत पोलीसांनी देशी व विदेशी दारू जप्त केली. ही कारवाई अप्पर अधीक्षक समाधान पवार यांच्या पथकांने मंगळवारी दुपारी केली.मंगळवारी दुपारी जालना- अंबड रोड वरील लोकसेवा ढाब्यावर पोलिसांनी छापा मारला. यावेळी ६६ देशी व विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या बाटल्याची किंमत ६ हजार १२० रुपये आहे. शेख आसेफ शेख नईम (२२) याला पोलीसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर एमआयडीसी येथील जयश्री साई ढाब्यावर छापा मारला. येथून २०९ देशी व विदेशी दारु बाटल्या पोलीसांनी जप्त केल्या. या बाटल्याची किंमत १९ हजार ६२० रुपये आहे. दशरथ श्रीपत कोल्हे (रा. दवळेक्ष्वर कॉलनी जालना) याला पोलीसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 12:59 AM