लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आष्टी, जाफराबाद येथे झालेल्या चोरी आणि दरोडा प्रकरणातील चोरटे पोलिसांच्या टप्प्यात आहेत. आष्टीतील दरोडा प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक मध्यप्रदेशला रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.दिवाळी निमित्त कायदा व सुवव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी खबदारी घेतली. दिवाळीतच कोम्बिंग आॅपरेशन सुरू ठेवले. असे असताना चोरट्यांनी पोलीसांच्या नाकावर टीच्चून आष्टी तसेच जाफराबाद येथे चोरी आणि दरोडे घालून लोकांना चाकूचा धाक दाखवून सहा लाख रूपयांचा ऐवज लंपास केल्याने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस अधीक्षक चैतन्य यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
आष्टी, जाफराबाद येथील दरोडेखोर पोलिसांच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 1:02 AM