लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तक्रारदारविरुध्द निघालेला समन्सची तारीख वाढवून घेण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना तालुका जालना पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक बाळासाहेब रामचंद्र गाडेकर यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रात्री अंबड मार्गावरील मातोश्री लॉन्स परिसरात रंगेहाथ पकडले.संबंधित तक्रारदाराविरुध्द नॉन बेलेबल वॉरंट निघाला होता. मात्र संबंधित तक्रारदाराविरुध्द पोलीस नाईक गाडेकर याने कारवाई न करता न्यायालयातून वॉरंट रद्द करण्यासाठी सवलत दिली होती. तक्रारदाराने न्यायालयातून वॉरंट रद्द करुन आणला होता. त्याचा मोबदला म्हणून पोलीस नाईक गाडेकर यांनी एक हजार रुपयांची लाच मांगितली होती. तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत विभागाकडे शनिवारी तक्रार केली होती. ‘एसीबी’च्या पथकाने पडताळणी करुन गाडेकर यास लाच घेताना सोमवारी रंगेहाथ पकडले. उपअधीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
लाच घेताना पोलीस नाईक सापळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 12:40 AM