रवी गात ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : तालुक्याला वाळू तस्करीच्या रुपाने निर्माण झालेल्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. वाळू तस्करांशी सलगी केल्याच्या संशयावरुन मागील दीड महिन्यात तालुक्यातील चार पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे यापैकी तीन पोलीस अधिकारी एकट्या गोंदी पोलिस ठाण्याचे आहेत.कधीकाळी तालुक्याला लाभलेल्या गोदाकाठाचा सामान्य शेतकरी व नागरिकांना मोठा अभिमान होता, मात्र आता हाच गोदाकाठ तालुक्यातील जनतेच्या सामाजिक, सांस्कृतीक, आर्थिक जीवनाच्या गळयाचा फास बनला आहे. गोदा काठी सुरु असलेला अवैध वाळू तस्करीचा हैदोस व या तस्करीला असलेली महसुल व पोलिस अधिका-यांची मूक संमती यामुळे गोदाकाठच्या जीवनाचा समतोल पूर्णपणे बिघडला आहे. तरुणाईत पदार्पण करणारी युवा पिढी वाळू तस्करीतून येणा-या सोप्या पैशामुळे व्यसनांच्या विळख्यात अडकत चालली आहे तर दुसरीकडे अशा युवकांच्या खिशातील पैशावर डोळा ठेवून या भागात विविध प्रकारचे अवैध व्यवसाय निर्माण झाले आहेत. गोदाकाठच्या परिसरातील औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बहुतांश ढाब्यांवर अवैध दारु विक्री सुरु आहे,
वाळूमाफियांशी सलगी पोलिसांना भोवली..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:33 AM