नरीमाननगर भागातून दुचाकीची चोरी
जालना : शहरातील नरीमाननगर भागात राहणारे सय्यद जहीर सय्यद रफीक यांनी १२ डिसेंबर रोजी रात्री त्यांची दुचाकी (क्र. एम.एच.२१- ए.झेड. ५४८०) नरीमाननगर भागात लावली होती. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीवरून कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना घुगे हे करीत आहेत.
उसाचा ट्रक नेण्यास मज्जाव, एकावर गुन्हा
जालना : अंबड तालुक्यातील जोगलादेवी येथील आप्पा सुरवसे यांच्या शेतातील उसाची १४ फेब्रुवारी रोजी तोड सुरू होती. त्यावेळी तेथे आलेल्या प्रल्हाद खोजे याने उसाचे वाहन नेण्यास मज्जाव करून धमकी दिल्याची तक्रार सुरवसे यांनी गोंदी ठाण्यात दिली. या तक्रारीवरून प्रल्हाद खोजेविरूद्ध गुन्हा दाखल झाला. तपास पोकॉ माळी हे करीत आहेत.
दोघांना मारहाण, पाच जणांवर गुन्हा
परतूर : शहरातील लड्डा कॉलनी, कुरेशी गल्लीतील शेख अमीर शेख हाफीज व त्यांचे सहकारी बुधवारी सकाळी मुस्तफामारास मंदिराजवळील पेट्रोल पंपावर आले होते. त्यावेळी तेथे आलेल्या शेख इम्रान शेख मुस्तफा शहा, अमिर मुस्तफा शहा, गुड्डू मुस्तफा, सय्यद मुस्तफा, मन्नी मुस्तफा (सर्व रा. परतूर) यांनी आमच्या जमिनीवर पाय का ठेवला असे म्हणत मारहाण केल्याची तक्रार शेख यांनी परतूर ठाण्यात दिली. या तक्रारीवरून वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास सपोनि. ठाकरे हे करीत आहेत.
ढवळेश्वर भागातील घरामध्ये चोरी
जालना : शहरातील गोपालनगर ढवळे भागातील सुखदेव कमळाजी उगले हे २ ते १६ फेब्रुवारी दरम्यान कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरी चोरी केली. यात २६ हजार रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी उगले यांनी दिलेल्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना बोडखे हे करीत आहेत.