दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिक्षणाचा मूळ पाया मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या जालना जिल्ह्यातील शाळांचे तीन तेरा वाजले असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे.जिल्ह्यातील एक, दोन नव्हे तर तब्बल २७५ ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था झाली आहे. स्लॅब गळणे, फरशी खराब होणे, दरवाजे खिडक्या तुटणे, भिंतीचे प्लास्टर उखडल्याचे दिसून येते. त्यातील काही शाळांची इमारत ही अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने त्या पाडून त्या ठिकाणी नव्या इमारतींचे बांधकाम करावे लागणार आहे. विशेष म्हणजे, काही शाळांमध्ये विद्युत पुरवठा नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील अनेक जि. प. शाळेतील विद्यार्थी हे जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. यासाठी जि.प. च्या शिक्षण विभागाला सरकारकडून ४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तो अद्याप अखर्चित आहे.निधी वितरणात असमानताशाळांचा दर्जा ढासळल्यानंतर पटसंख्या वेगाने कमी होऊ लागली. सर्वसामान्यांचा आधार असलेल्या या शाळा बंद पडण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर जि.प.ने विशेष प्रयत्न करुन शाळांचा दर्जा वाढवला. अशा प्रयत्नातून काही शाळांची स्थिती बदलली आणि या शाळांच्या बाहेर प्रवेश फुल्लचे फलक लागले. मात्र इतर शाळांची अवस्था पूर्वीप्रमाणेच राहिली. निधी वितरित करताना चांगल्या शाळांकडे जास्त लक्ष दिल्याने इतर शाळांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळेच जि.प.च्या सर्व शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे.
शिक्षण ‘दीन’...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 12:31 AM