भिलपुरीत वृक्षारोपण
जालना : तालुक्यातील भिलपुरी (खुर्द) ग्रामपंचायतच्या वतीने नुकतेच पाचशे झाडे लावण्यात आली. यावेळी सरपंच भाऊसाहेब गोरे, उपसरपंच बाबासाहेब आंबडकर, गणेश गोरे, रामेश्वर गोरे, आण्णासाहेब गायकवाड, नामदेव गोरे, नरहरी गोरे, पुंजाराम गोरे आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण
भोकरदन : भोकरदन तालुक्यातील वाकडी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल चिंचपुरे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी कृषी सहायक आर. बी. तळेकर, माजी सरपंच काशिनाथ शिरसाट, उपसरपंच रामकृष्ण सुसर, नितीन देवकर, समसुद्दीन तडवी, भगवान शिरसाट, संभाजी वाघ, सुभाष साळवे, आर. एस. लांडगे आदींची उपस्थिती होती.
मक्याच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव
भोकरदन : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात बाराशे हेक्टरवरील मक्याच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पीक धोक्यात आले आहे. यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासून पाऊस नसल्यामुळे मका, सोयाबीन, कपाशी आदी पिके सुकू लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात असल्याचे दिसून येते. त्यातच मक्यावर अळीचा प्रादुर्भाव झाला असून, शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
मेरखेडा, आडा येथे वृक्षारोपण
जाफराबाद : एचडीएफसी बँक परिवर्तन व वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर) यांच्या माध्यमातून मेरखेडा व आडा येथे वृक्षारोपण करण्यात आले. गावातील सार्वजनिक ठिकाणी वड, पिंपळ, लिंब, चिंच, बदाम, जांभूळ, गुलमोहर, रेन ट्री आदी प्रकारची ९० झाडे लावण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार विवेक पाटील, गणपत कबाडी, केवट, दिनेश कड आदींची उपस्थिती होती.
उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
परतूर : तालुक्यातील हातडी येथील पाझर तलावाला पडलेल्या भगदाडाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या निवेदनावर सरपंच मधुकर झरेकर, माजी सरपंच गणेश झरेकर, उपसरपंच राजाराम गाढवे, दुर्वास फटिंग, तुकाराम खिल्लारे, गणेश फटिंग, रामा फटिंग, मुक्तिराम फटिंग आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पोलीस पाटील असोसिएशनची बैठक
विरेगाव : पोलीस पाटलांनी काम करत असताना लाेकावर होणारा अन्याय व विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे, असे पोलीस पाटील असोसिएशनचे अध्यक्ष महादेव नागरगोजे यांनी सांगितले. विरेगाव येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी छगन किटाळे, कैलास गुंजाळ, भानुदास कदम, जीवन नालेगावकर, संजय भुतेकर, अंकुश बिलोरे, नंदू साबळे आदी उपस्थित होते.
आष्टी एसबीआय बॅंकेतील पदे रिक्त
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा अधिकारी वसंत काळे, फिल्ड ऑफिसर लटारे यांची पंधरा दिवसांपूर्वी बदली झाली आहे. रिक्त पदांवर अजून कुणीच रुजू न झाल्याने शेतकऱ्यांच्या पीककर्जासह विविध कामे खोळंबली असून, केवळ तीन कर्मचाऱ्यांवर बँकेचा भार आहे. शेतकऱ्यांच्या आलेल्या फायली केवळ जमा करून घेण्याचे काम केले जात आहे.