हा वीजपुरवठा खंडित झाल्यावर तो पूर्ववत कधी होणार याबाबत आधी किमान कॉलसेंटर होते. तेथील लँडलाइन मोबाईल सेवाही आत बंद झाली आहे. नेमकी याची विचारणा कुठे करावी असा प्रश्नही निरूत्तरीत आहे. सध्या जालना शहरातील वीज वितरण कंपनीला शहर अभियंता मोरे हे एसीबीच्या जाळ्यात अडकले असून, त्यांना ३० हजार रूपयांची लाच घेताना अटक झाल्याने जबाबदार अधिकारी देखील उपलब्ध होत नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
संपर्काचे क्रमांक देण्याची गरज
विद्युत पुरवठा हा तांत्रिक कारणामुळे अथवा वादळी वारे, पाऊस यामुळे खंडित होऊ शकतो. परंतु अशी कुठलीच आपत्ती नसतानाही चार-चार तास शहरातील वीजपुरवठा बंद पडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासाठी किमान कॉलसेंटरचा क्रमांक सुरू ठेवून एखादा जबाबदार अधिकारी यासाठी नियुक्त करावा अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे.