जालना : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात रमजान ईद अर्थात ईद-उल-फित्र परंपरागत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सामूहिक नमाज अदा करण्यासह, चांगला पाऊस पडवा म्हणून प्रार्थना करण्यात आली. शनिवारी सकाळी जुन्या जालन्यातील कदीम जालना ईदगाहमध्ये सर्वात मोठी सामूहिक नमाज अदा करण्यात आली.प्रारंंभी इक्बाल पाशा यांनी रमजान महिन्याचे महत्व आणि त्या महिन्यात करण्यात येणाऱ्या विविध धार्मिक तसेच मानवी जीवनशी संबंधित तत्वज्ञानाची सविस्तर माहिती दिली. यावेळी मौलाना गुफरान यांनी सामूहिक नमाज अदा केली. यावेळी मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती. ईदगाहचे मैदान आणि मोतीबागेकडे जाणा-या रस्त्यावरही नमाजासाठी गर्दी झाल्याचे दिसून आले. ईदनिमत्त पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नमाजनंतर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आ. कैलास गोरंट्याल, शब्बीर अन्सारी, इदगाहचे मुतावली तथा नगरसेवक शाह आलमखान, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, शेख महेमूद, बाबूराव सतकर, सत्संग मुंडे, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, तहसीलदार डॉ. बिपीन पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, शिवाजी बंटेवाड, फेरोज अली मौलाना, अब्दुल हफिज, नगरसेवक आमेर पाशा, गोपाल काबलिये, विनोद यादव, मोहन इंगळे, गणेश सुपारकर, राम सुपारकर, माजी नगरसेवक आयुबखान पठाण, आदींची उपस्थिती होती.नवीन जालन्यातील सदरबाजार, गांधीनगर ईदगाहमध्येही सामूहिक नमाज अदा करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक नूरखान, फेरोजलाल तांबोळी, अकबरखान, लतीफ कादरी, मोहम्मद इफ्तेखारोद्दीन यांच्यासह अन्य मान्यवर समाजबांधवांची उपस्थिती होती.यावेळी समाजात तसेच देशात सुख, शांती राहण्यासह आपापसातील भाईचारा कायम राहण्यासाठी देखील प्रार्थना करण्यात आली.जुना जालन्यातील कदीम जालना ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधवांनी गर्दी केल्याने रस्ते फुलले होते. ईदनिमित्त लावण्यात आलेल्या अत्तरामुळे सर्वत्र सुगंध पसरला होता.
चांगल्या पावसासाठी प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:21 AM