लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वच्छ जालना आणि सुंदर जालना करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. पालिकेच्या शाळांतील गुणवत्ता वाढीसाठी डिजिटल करण्यासह फेरीवाला धोरण, शहरातील पथदिव्यांची समस्या अन्य काही मुद्द्यांवर आगामी काळात काम केले जाईल. गत वर्षभरात अंतर्गत जलवाहिनी अंथरणे, भूमिगत गटार, अनेक अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण व प्रशासकीय सुसूत्रता आणण्यात यश आल्याचे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी बुधवारी सांगितले.नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारुन एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी वर्षभरातील कार्याचा लेखाजोखा मांडला. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, अतिरिक्त मुख्याधिकारी केशव कानपुडे, माजी आ. कैलास गोरंट्याल, गटनेते गणेश राऊत, सभापती महावीर ढक्का, शाह आलम खान, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, राम सावंत, राहुल हिवराळे, मेघराज चौधरी, शेख महेमूद, नजीब लोहार उपस्थित होते.नगराध्यक्षा गोरंट्याल म्हणाल्या की, शहरातील बंद पथदिव्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. एकूण थकबाकीपैकी ६ कोटी रुपये कमी करण्यात यश आले. सद्यस्थितीत ४ कोटींची थकबाकी भरुन लवकरच पथदिवे सुरू होतील, त्यादृष्टीने काम सुरु आहे. तसेच १२७ कोटी ६५ लाख रुपये खर्चाची अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याचे काम प्रगतीपथावर आहे. नऊपैकी पाच जलकुंभांचे कामही प्रगतीपथावर आहे. मलनिस्सारण प्रकल्प मंजूर झाला असून, याचेही काम लवकरच सुरू होणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत हरित क्षेत्र विकास योजनेतून पालिकेला ४ कोटींचा निधी मिळाला आहे. मोतीबाग परिसरातील तब्बल २५ एकरवर फॉरेस्ट डेव्हलप करण्यात येणार आहे. यात विविध जातींच्या वृक्षांची लागवड व संवर्धन केले जाणार आहे. याची निविदा प्रक्रिया सुरु असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी नव्याने डीपीआर तयार करण्यात आला आहे. त्यानुसार स्वच्छतेसाठीचे साहित्य व सामग्री खरेदी केली जाईल. पुरेस मनुष्यबळदेखील नियुक्त केले जाणार आहे. आगामी मार्च महिन्यापर्यंत शहर स्वच्छ होईल, असा दावा त्यांनी केला.शहरातील तेरा ठिकाणी ३१८ सीटचे शौचालय बांधण्यात आले आहेत. शहर दुर्गंधीमुक्त करण्यासाठी ४२ ओडी स्पॉट पूर्ण निष्कासित केले आहेत. आरोग्य सुविधा, अग्निशमन विभागासाठी जानेवारीत वाहने उपलब्ध होतील. शहरातील पालिकेच्या ११ शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. २ शाळा सेमी इंग्रजी केल्या आहेत. दोन ठिकाणी ११० विद्यार्थी संख्या वाढल्याचे नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी आवर्जून सांगितले.उत्पन्न वाढीसाठी विशेष प्रयत्नच्शहरातील टाऊन हॉलमधील गाळ्यांचा प्रलंबित असलेला प्रश्न सोडविण्यासाठी तडजोडीचे प्रयत्न सुरु आहेत. ती होताच या गाळ्यांचे पालिकेकडे हस्तांतरण होईल. त्यानंतर गाळ्यांची भाडे वसुली पालिकेकडून केली जाईल.च्तसेच जवाहर बागमध्ये नवीन जालनावासियांसाठी उद्यान विकसित केले जाणार आहे. आझाद मैदानासह इतर भागांतील बीओटी तत्त्वावरील कामांचा आढावा घेऊन आगामी काळात पालिकेचे उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जाईल, असे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी सांगितले.
हिंगोली शहर स्वच्छतेला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:10 AM
स्वच्छ जालना आणि सुंदर जालना करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. पालिकेच्या शाळांतील गुणवत्ता वाढीसाठी डिजिटल करण्यासह फेरीवाला धोरण, शहरातील पथदिव्यांची समस्या अन्य काही मुद्द्यांवर आगामी काळात काम केले जाईल. गत वर्षभरात अंतर्गत जलवाहिनी अंथरणे, भूमिगत गटार, अनेक अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण व प्रशासकीय सुसूत्रता आणण्यात यश आल्याचे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी बुधवारी सांगितले.
ठळक मुद्देसंगीता गोरंट्याल : वर्षभरातील कामगिरीचा मांडला लेखाजोखा