त्यानुसार शहरातील विविध भागात फिरून मूर्तींचे संकलन करण्यासाठी ३२ गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मोती तलाव परिसरातही मोजक्याच गणेश भक्तांना तलावाजवळ जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. तेथे विद्युत व्यवस्थेसह तगड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सर्व तयारीची पाहणी शनिवारी आ. कैलास गोरंट्याल, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी केली. यावेळी अभियंता सौद यांनी सर्व माहिती दिली.
चौकट
पोलिसांचे पथसंचलन
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शांतता राहावी यासाठी पोलिसांनी जुना आणि नवीन जालना भागातून पथसंचलन करून शांतता राखण्याचे आवाहन केले. यावेळी शहराच्या विविध भागात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यात ७४३ पोलीस, गृहरक्षक दलाचे जवान २६४, महिला ४३, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, तसेच दहा पोलीस उपनिरीक्षक, तसेच सहायक पोलीस निरीक्षक ७३, पोलीस निरीक्षक १८, उपविभागीय पोलीस अधिकारी तीन असा बंदोबस्त जिल्हाभरात तैनात केला असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक व्यास यांनी दिली.