तळणी : मंठा तालुक्यातील तळणी शिवारात सोयाबीन काढणीला सुरुवात झाली आहे. नव्या सोयाबीनला १० हजार रूपयांचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांत उत्साह दिसून येत आहे.
तळणी येथील शेतकरी रामेश्वर येऊल यांच्या शेतातील एक एकर मधील सोयाबीन सोंगून मळणी यंत्रातून काढून घरी आणण्यात आले. इतर शेतकऱ्यांनीही सोयाबीन काढणी सुरू केली आहे. परंतु, सणाच्या दिवसांमुळे मजुरांची टंचाई जाणवत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. अनेकजण कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन सोयाबीन काढणी करीत आहेत. तळणी येथून १२ किलोमीटर अंतरावरील लोणार (जि. बुलडाणा) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन दिवसांपूर्वी नव्या सोयाबीनला १० हजारांचा भाव मिळाला असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यात उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, योग्यवेळी लागवड व संगोपणामुळे सोयाबीन लवकर काढणीस आले असून, एकरी आठ पोत्यांचा उतारा मिळाल्याचे शेतकरी रामेश्वर येऊल यांनी सांगितले.
फोटो