शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

प्रलंबित प्रकल्पांना प्राधान्य-  दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 12:33 AM

काही प्रकल्प अर्धवट असतील, ते पूर्ण करण्यासाठी आपण निधी खेचून आणून ते पूर्ण करण्यास प्राधान्य देणार असल्याची माहिती केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या इनिंगमध्येही माझ्यावर पुन्हा विश्वास दाखवण्यात आल्याने आपण आनंदी आणि समाधानी आहोत. गेल्या पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने राज्याच्या विकासाच्या अनेक महत्वकांक्षी योजना राबविल्या. त्यातील काही प्रकल्प अर्धवट असतील, ते पूर्ण करण्यासाठी आपण निधी खेचून आणून ते पूर्ण करण्यास प्राधान्य देणार असल्याची माहिती केंद्रिय राज्यमंत्रीरावसाहेब दानवे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.मंत्री पदाची शपथ घेतल्यावर ते प्रथमच जालन्यात आले होते. यावेळी ते म्हणाले की, मंत्री मंडळात समावेशाची खात्री होती, आणि झालेही तसेच, त्याच मंत्रालयात मी यापूर्वी काम केले असल्याने ते माझ्यासाठी नवीन नाही. देशातील ८० कोटी नागरिकांना अन्नसुरक्षा कायद्या अंतर्गत अन्नधान्याचा पुरवठा केला जात आहे. या कायद्यात दरवर्षी दहा टक्के दरवाढ करण्याचे नमूद आहे. परंतु मोदी यांनी ही दरवाढ केली नसल्याने गरिबांना त्याचा मोठा लाभ होत आहे. अन्न आणि नागरिपुरवठा तसेच ग्राहक संरक्षण ही अत्यंत महत्वाची खाते आहेत. त्या विभागात तर आपण लक्ष घालणारच असून, केंद्राच्या योजने अंतर्गंत जे काही म्हणून प्रकल्प मार्गी लावणे शिल्लक आहे, ते विशेष लक्ष देऊन त्यासाठी निधी देणार आहोत.जालना शहरातील ड्रायपोर्ट, आयसीटीची इमारत उभारणे तसेच सागरमाला योजने अंतर्गत औरंगाबाद ते हैदराबाद मार्गाचे सहा पदरीकरण करण्यासह अन्य विकास योजनांचा त्यात समावेश आहे. राज्याची सिंचन क्षमता वाढविण्यायसाठी यापूर्वीच बळीराजा योजनेतून ९० अर्धवट प्रकल्पांसाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचाही पाठपुरावा आपण करणार आहोत.राजकीय विषयांवर छेडले असता, ते म्हणाले की, भाजपने काँग्रेस मुक्तचा नारा दिला होता. तो जनतेने खरा करून दाखला आहे. राफेलचा मुद्दा सोडल्यास काँग्रेसला आमच्या सरकारवर टिका करण्यासाठी दुसरा मुद्दाही मांडता आला नाही. पंतप्रधान मोदींच्या शपथविधीवेळी राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाचव्या रांगेत बसवण्याच्या मुद्यावरून विचारले असता, ते म्हणाले की, हा विषय राष्ट्रपती कार्यालयातून ठरतो. ज्यांचा जसा सन्मान असेल तसा मान त्यांनी दिला. त्यात राजकारण आणण्याचा आमचा कुठलाच हेतू नव्हता असेही दानवेंनी स्पष्ट केले.राज्याच्या मंत्री मंडळाच्या विस्तारा बद्दल त्यांनी सकात्मकता दर्शवली. अधिवेशनापूर्वी हा विस्तार होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले. तुमचा उत्तराधिकारी कोण असे विचारले असता, तो पक्ष निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. आजही आपण प्रदेशाध्यक्षपदी कायम असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जुन केला. या पत्रकार परिषदेस माजी आ. अ‍ॅड. विलास खरात यांची उपस्थिती होती. या पत्रकार परिषदेत जालना शहरातील नेहरू रोड काद्राबाद रस्ता रूंदीकरणाबाबत चर्चा झाली. त्याचा प्रस्ताव पालिकेने द्यावा, आपण त्यासाठी पाहिजे तेवढा निधी आणून देऊ असे दानवे म्हणाले. महात्मा फुले मार्केटबाबत जुन्या व्यापाऱ्यांना प्राधान्य देण्याच्या बाजूचे आपण असल्याचे ते म्हणाले.आपण दिल्लीत जरी गेलो असलो तरी राजाच्या कवडीच्या गोष्टी प्रमाणे आपले लक्ष हे मतदारसंघातच असते. पंतगाची डोर ही शेवटी जनतेच्या हातात असते. पतंगाची डोर आपल्या हातातून निसटली की, पतंग गटारात पडतो. असे सांगितल्यावर एकच हशा पिकला. यावेळी औरंगाबाद येथील पतंगाच्या विजयावरून रावसाहेब दानवे हे नाहक टिकेचे धनी ठरत आहेत. त्यांचे जावई आ. हर्षवर्धन जाधव यांना अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा आरोप दानवेंवर होत असून, या आरोपात तथ्य नसल्याचा खुलासा त्यांनी आज येथे केला. आपण औरंगाबदेत चंद्रकांत खैरे उभे नव्हते तर नरेंद्र मोदी हेच उभे होते असे समजून भाजपने सर्व ती मदत केल्याचे सांगितले.

टॅग्स :Raosaheb Danweरावसाहेब दानवेCentral Governmentकेंद्र सरकारministerमंत्रीPoliticsराजकारण