लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या खतांच्या किमतीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादनाचा खर्च वाढत असून सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत चालले आहे. यामुळे शेती तोट्यात चालली असून दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांना खरिपासाठी खतांचा मोफत पुरवठा करण्याची मागणी होत आहे़केंद्र शासनाने गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांना दिले जाणारे अनुदान कमी करण्याचे धोरण अवलंबविल्यामुळे दिवसेंदिवस खत कंपन्यांकडून रासायनिक खतांच्या किमतीत वाढ होत आहे़ सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत खताच्या एका गोणीमागे सुमारे दीडशे ते दोनशे रूपये भाववाढ झाली आहे़ यामुळे शेतक-यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. खरीप हंगामासाठी शेतक-यांनी आपल्या शेतीची मशागत सुरू केली. यंदातरी चांगला पाऊस पडेल या आशेवर शेतकरी खरीप हंगामाचे नियोजन करीत आहेत.दरवर्षी शेतकरी उन्हाळ््याच्या शेवटी खतांची निवड करून त्याची खरेदी सुरू करीत असतात. मात्र, यावर्षी खतांची भरमसाठ भाववाढ झाल्यामुळे शेतक-यांनी अद्यापही खतांची खरेदी सुरू केलेली नाही. या दरवाढीमुळे शेतक-यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता असून शेतक-यांपुढे आता दुष्काळानंतर खत दरवाढीचे नवे संकट उभे राहिले आहे.दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांना शासनाने मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे.त्यासाठी शेतक-यांना खरीप हंगामासाठी क्षेत्रनिहाय मोफत खत पुरवठा करण्याची मागणी शेतक-यांमधूून होत आहे़शेतीचे उत्पन्न वाढवायचे असेल तर शेतक-यांना खताचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही.मोफत खतपुरवठा करावाया तालुक्यात सध्या पिण्याचे पाणी टंचाई, चारा टंचाई यासोबतच शेतीच्या पाण्याची टंचाईसुध्दा तीव्र प्रमाणात आहे. शेतीत पाणी नसल्यामुळे शेतकºयांना यावर्षी खरीप व रबीची पिके घेता आली नाहीत. जी थोडीफार पिके आली त्या पिकाला लागलेला खर्चही यातून निघालेला नाही. तसेच तालुक्यात असलेल्या मोसंबी, डाळींब अशा अनेक फळबागाही पाणी नसल्यामुळे नष्ट होत आहेत.या फळबागांमधून शेतक-यांना मिळणारे लाखो रूपयांचे उत्पन्न आता मिळणार नाही. अशा प्रकारे तालुक्यात शेतक-यांना शेतीतून आर्थिक उत्पन्न तर मिळालेच नाही. शेतीची मशागत, पेरणी, खते, कीटकनाशके अशा विविध बाबींसाठी घेतलेले कर्ज फेडता आले नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे़ अशा प्रकारे यावर्षीच्या दुष्काळाने शेतकरी मोठा आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेतक-यांना येणा-या खरीप हंगामासाठी बियाणे, खत, कीटकनाशके कशी खरेदी करणार, ही चिंता लागली आहे. त्यातच आता येणाºया खरीप हंगामासाठी लागणा-या खतांच्या किंमतीही भरमसाठ वाढल्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे़अनेक खत विक्रेत्यांकडे जुन्या किंमतीचाही खतसाठा शिल्लक आहे. हा जुन्या किंमतीचा खतसाठा नवीन किंमतीत शेतक-यांच्या माथी मारला जाण्याची शक्यता आहे. अनेक शेतकरी निरक्षर असतात. त्यांना खतांचे दर वाढले एवढेच माहिती असते. परंतु, आपण घेतलेल्या खताच्या गोणीवर किती किंमत आहे हे निरक्षर शेतक-यांना माहिती नसते, त्यांना जुन्या खताच्या गोणीचाच नवीन दराने विक्री होवू शकते.कृषी विभागाने ज्या खत विक्रेत्यांकडे जुन्या किंमतीचे खत आहे. तेच खत सुरूवातीला विक्री करण्याचे व त्याचा अहवाल पाठविण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे़ दुकानात जुन्या दराचे खत असताना नवीन दराचे खत विक्री होऊ नये व जुन्या दराचे खत नवीन दरात विक्री होणार नाही. याकरीता भरारीपथकाची नेमणूक करून शेतकºयांची आर्थिक पिळवणूक होणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे.
उत्पादनाचा खर्च वाढला; मात्र उत्पन्न घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:42 AM