लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पोलीस उपनिरीक्षक विभागीय अर्हता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या राज्यभरातील दीड हजार उमेदवारांना अखेर सात वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. परीक्षा दिल्यानंतर जालना जिल्ह्यातील अनेक हवालदार पदोन्नतीच्या प्रतीक्षेत सेवानिवृत्त झाले होेते.परंतु जालना जिल्ह्यातील सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या चौदा पोलीस हवालदारांना आता पदोन्नतीचे आदेश मिळाल्याने त्यांचे फौजदार होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. पदोन्नतीचे आदेश आलेल्या या चौदाही हवालदारांना जालना जिल्ह्यातच पदोन्नती मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांची सेवानिवृत्ती जवळ आल्यामुळे त्यांना नेमणुकीच्या जिल्ह्यातच नियुक्तीचा लाभ मिळेल.यात पदोन्नतीत कमलाकर अंभोरे, रामदास काकडे, शिवाजी पोहार, वसंत इंगोले, नागनाथ भताने, सुरेश क्षीरसागर, निवृत्ती काकडे, राजेंद्र खरात, गणेश सोळुंके, अर्जुन पवार, गजानन सोनुने, मधुकर पाटील, गजानन कायंदे, वसंत शेळके यांचा समावेश असल्यावे दिसून आले.
जालना जिल्ह्यातील चौदा हवालदारांना पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 1:07 AM