शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

उत्तम आरोग्यासाठी भरीव निधीची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 12:30 AM

आणखी एक शंभर खाटांचे अद्ययावत नवीन रुग्णालय उभारण्यासाठी ३० कोटी रुपयांची मान्यता दिली असून, त्यातील ४ कोटी रुपये प्राप्त झाले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जुना जालना भागातील गांधी चमन स्थित महिला व बाल रुग्णालयास शंभर खाटांची मान्यता मिळाली असून, त्यासाठी लागणारे अतिरिक्त ४१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे, तर आणखी एक शंभर खाटांचे अद्ययावत नवीन रुग्णालय उभारण्यासाठी ३० कोटी रुपयांची मान्यता दिली असून, त्यातील ४ कोटी रुपये प्राप्त झाले असल्याची माहिती राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली.शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत खोतकर यांनी माहिती देताना सांगितले की, गांधीचमन येथील महिला व बाल रुग्णालयात शंभर खाटा व्हाव्यात, अशी इच्छा युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी लोकार्पण सोहळ्यात व्यक्त केली होती.त्याचा पाठपुरावा आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केला होता. त्या संदर्भात मंत्रालयीन पातळीवर तीन बैठकाही घेण्यात आल्या. या बैठका घेतल्यानंतर त्या संदर्भात राज्य सरकारने हे निर्णय घेतल्याचे खोतकर म्हणाले.यामध्ये गगांधीचमन येथील महिला व बाल रुग्णालयात पूर्वी वैद्यकीय तसेच अन्य कर्मचा-यांची संख्या ५१ होती. त्यामुळे रुग्णांना दर्जेदार सेवा देताना अडचण येत होत्या.ही बाब लक्षात घेवून आता ४१ अतिरिक्त पदांना मंजुरी मिळाली आहे. तर नवीन शंभर खाटांचे रुग्णालय देखिल मंजूर झाले असून, त्यासाठी तीस कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. यापैकी ४ कोटी रुपये प्राप्त झाले असल्याचेही सांगण्यात आले.पत्रकार परिषदेस शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, माजी आ. संतोष सांबरे, पंडित भुतेकर, भाऊसाहेब पाऊलबुद्धे आदींची उपस्थिती होती.जालना : एमबीबीएस महाविद्यालयाचा प्रस्तावजालना येथील शासकीय रुग्णालयामध्ये महिला तसेच जिल्हा रुग्णालय मिळून ५०० खाटा उपलब्ध आहेत. यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने जालन्यात एमबीबीएस महाविद्यालय सुरू व्हावे, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. तो अद्याप मंजूर झाला नसला तरी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यात पुढाकार घेतल्यास त्याच्या मंजुरीला गती मिळू शकते.- डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्यArjun Khotkarअर्जुन खोतकर