लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील हमीभाव केंद्रावर एक हजार शेतक-यांकडून ७ मार्चपर्यंत ५ कोटी रूपयांची तूर खरेदी करण्यात आली. जालना सेंटरवरील १५० शेतक-यांना ७२ लाख रूपये वगळता इतर ९२३ शेतक-यांना तुरीच्या पैशांची प्रतिक्षा लागून आहे. मात्र महिना उलटूनही शेतक-यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होत नसल्याने शेतक-यांत नाराजी आहे. तुरीचे पैसे कधी जमा होणार, अशी विचारणा शेतक-यांतून होत आहे.जिल्ह्यातील जालना, मंठा, परतूर, भोकरदन, अंबड आष्टी, तीर्थपुरी आणि जाफराबाद आदी आठ केंद्रांवर १ हजार शेतक-यांकडून ९ हजार ३७३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. तूर खरेदीच्या आठवड्यानंतर शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येईल असे नाफेडकडून सांगण्यात आले होते. शेतकºयांतून ओरड झाल्यानंतर नाफेडने पहिल्या टप्प्यात केवळ १५० शेतकºयांना ७२ लाख रूपये वितरीत केले. मात्र मोठ्या प्रमाणात शेतक-याकडून तूर खरेदी होत असताना पैसे मिळण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे शेतक-यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. नाफेडच्या अधिका-यांनी लक्ष देऊन तुरीचे पैसे बँक खात्यात वर्ग करण्याची मागणी होत आहे.आठवडाभरातरक्कम जमा होणारपहिल्या टप्यातील जालना सेंटरवरील १५० शेतकºयांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरीत ९२३ शेतक-यांचे बँक खात्याची पडताळणी पूर्ण झाली असून आठवड्याभरात शेतक-यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात येणार असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी गजानन मगरे यांनी सांगितले.
जिल्ह्यात पाच कोटी रूपयांची तूर खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 12:57 AM